Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजि.प.अधिकारी, सेवकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर

जि.प.अधिकारी, सेवकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर

नाशिक । Nashik

जिल्हा परिषद नाशिकच्या सर्व अधिकारी आणि सेवक यांच्यासाठी स्वतंत्र कोविड सेंटर देण्यात आले असून ग्रामीण पोलीस रुग्णालय,आडगाव येथे पस्तीस बेड यासाठी आरक्षित करून ठेवले आहेत. या निर्णयाचे जिल्हा परिषदेच्या अधिकारी, सेवक वर्गाने स्वागत केले आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व सेवकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर असावा,यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी ही नेहमी आग्रही होते. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण पोलीस रुग्णालय आडगाव येथे पस्तीस बेड अधिकारी व सेवकांसाठी आरक्षित करून ठेवले आहेत.

त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर ,डॉ.दावल साळवे यांचे जिल्हा परिषद नाशिकचे अधिकारी आणि सेवक यांनी समाधान व्यक्त केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या