Saturday, April 27, 2024
Homeनगरजिरायत भागाच्या स्वतंत्र महसूल मंडलाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

जिरायत भागाच्या स्वतंत्र महसूल मंडलाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal

राहाता तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतंत्र महसूल मंडळ तयार करावे याबाबत तालुका काँग्रेसच्या मागणीची मुख्यंमंत्र्यांनी दखल घेतली

- Advertisement -

असून महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राहाता तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतत्रं महसूल मंडलांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राहाता तालुक्यात 13 जिरायती गावे आहेत. मात्र यांचे स्वंतत्र महसूल मंडल नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीतही जिरायत गावे भरडली जात आहेत. पीक विम्याचे परतावे, टंचाई अनुदान, कृषी विभागाच्या कोरडवाहू भागासाठी असलेल्या विविध योजना मिळण्यात या गावांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याने राहाता तालुका काँग्रेस आय कमेटीने डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, सचिव श्रीकांत मापारी, युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांनी सरकारकडे या महसूल मंडळाच्या फेररचनेसाठी मागणी केली होती.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही या मेलची दखल घेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. स्वतः मुख्यंमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळे तालुक्यातील जिरायत भागाचे स्वंतत्र महसूल मंडल होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या