Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

नाशिक | Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ध्वजवंदन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ.मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना विद्यापीठातर्फे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यापीठ आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. यावेळी कोव्हिड-१९ संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या