Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIND Vs SA 2nd T-20 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी विजय

IND Vs SA 2nd T-20 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी विजय

गुवाहाटी | वृत्तसंस्था

आसामच्या बारसापारा क्रिकेट मैदानावर आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात क्रिकेटचा दुसरा टी-२० सामना खेळण्यात आला. यात भारतीय संघाने बाजी मारली.

- Advertisement -

आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून के.एल. राहुल व रोहित शर्मा सलामीला फलंदाजीस आले. सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली.के.एल. राहुल व रोहित शर्मा यांनी दहाव्या षटकापर्यंत नाबाद ९७ धावा केल्या. दहाव्या षटकात ट्रिस्टन स्टबने रोहित शर्माला झेलबाद केले. रोहित शर्माने ३७ चेंडूत ७ चौकार व १ षटकार लगावत एकून ४३ धावा केल्या. १२ व्या षटकात केशव महाराजने के.एल.राहुलला पायचीत केले. के.एल.राहुलने २८ चेंडूत ५ चौकार व ४ षटकार लगावत एकून ५७ धावा केल्या.

विराट कोहली व सूर्यकुमार यादवच्या जोडीने धुव्वाधार फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ५ चौकार व ५ षटकार लगावत ६१ धावा करत टेंबा बावुमा कडून धावबाद झाला. विराट कोहलीनेही आक्रमक फलंदाजी करत २८ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने ७ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या. २० व्या षटका अखेरीस भारतीय संघाने ३ गडी बाद २३७ धावा केल्या.

भारतीय संघाने दिलेल्या २३८ धावांचे आव्हान पार करताना आफ्रिकेच्या संघाकडून टेंबा बावुमा व क्विंटन डी कॉक प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात भारतीय संघाने आफ्रिकेच्या संघास पहिला धक्का देत विराट कोहलीने टेंबा बावुमाला शून्यावर झेल बाद केले.. अर्शदीप सिंघच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने रिले रोसौवला झेलबाद करत शून्यावर माघारी पाठविले. अक्षर पटेलने एडन मार्करामला क्लीन बोल्ड केले. मार्करामने १९ चेंडूत ३३ धावा केल्या. क्विंटन डी कॉक ६९ तर व डेविड मिलरने नाबाद १०६ धावा केल्या. भारतीय संघाने दिलेल्या २३८ धावांचे आव्हान आफ्रिकेच्या संघास पूर्ण करता आले नाही. २० षटका अखेरीस आफ्रिकेच्या संघाने ३ गडी बाद २२१ धावा केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या