Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIND vs ENG 3rd Test : आजचा कसोटी सामना इशांत शर्मासाठी असणार...

IND vs ENG 3rd Test : आजचा कसोटी सामना इशांत शर्मासाठी असणार खास, कारण..

दिल्ली l Delhi

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबाच्या मोटेरा मैदानावर (Ahmedabad Motera Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

हा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा कसोटी सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. पिंक बॉलने (Pink Ball) हा सामना खेळला जाईल. दुपारी अडीज वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी आजचा सामना खास आहे कारण आज तो १०० वा कसोटी सामना खेळतोय. भारताकडून आतापर्यंत फक्त दहा खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. इशांत अकरावा खेळाडू ठरला आहे. इशांत गेली तब्बल १४-१५ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळतो आहे.

इशांतने २००७ ते २०११ दरम्यान १३० बळी घेतले. मात्र या पाचपैकी तीन वर्षांत त्याची सरासरी ३५ हुन तर इकॉनॉमी ३.५ हुन अधिक होती. याच इशांतने गेल्या चार वर्षात ९० बळी मिळवले आहेत. यात त्याची सरासरी २०१७ सोडलं तर इतर चार वर्षांत २३ हुन कमी आहे आणि इकॉनॉमी ३ हुन कमी आहे.

२०१८ च्या सुरुवातीपासून त्याची सरासरी १९.३४ एवढी आहे. इशांतची कारकीर्द दोन भागांत विभागली तर पहिल्या ४९ कसोटीत त्याने ३८.५३ च्या सरासरीने १३८ बळी मिळवले होते. तर नंतरच्या ४९ कसोटीत २६.९८ च्या सरासरीने १६२ बळी मिळवले.

तसेच आज खेळलेल्या जाणाऱ्या सामना ज्या स्टेडियमवर होत आहे ते ‘मोटेरा स्टेडियम’ जगातील सर्वांत क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता १,१०,१०० आहे आणि हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आणि जगातील दुसरे मोठे स्टेडियम आहे. उत्तर कोरियाच्या प्योंगयांग मधील Rungrado May Day मध्ये बसण्याची क्षमता १,१४,००० इतकी आहे. हे नवीन मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. या स्टेडियममध्ये ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. तसेच या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्टेडियम बनवणाऱ्या कंपनीने (L&T) असा दावा केला आहे की स्टेडियममध्ये अशा एलईडी दिवे लावण्यात आले आहेत की ज्यामुळी खेळाडूंची सावलीही कमी पडेल. त्याचबरोबर या स्टेडियमची पार्किंग सुविधाही चांगली असून. एकावेळी येथे ३००० कार आणि १० हजार दुचाकी वहाने पार्क केली जाऊ शकतात. या स्टेडियमच्या जून्या मैदानात काही खास विक्रम भारतीय खेळाडूंनी केले आहे. त्यातील उल्लेखनीय म्हणजे सुनील गावसकरांना १० हजार कसोटी धावांचा टप्पा याच मैदानात पार केला होता. तर कपिल देव यांनी रिचर्ड हेडली यांना मागे टाकत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम याच मैदानात खेळताना केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या