Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIND vs ENG 2nd Test : दिवसअखेर भारताच्या ६ बाद ३०० धावा

IND vs ENG 2nd Test : दिवसअखेर भारताच्या ६ बाद ३०० धावा

दिल्ली l Delhi

इग्लंडविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. भारतीय संघाने दिवसाखेर ६ बाद ३०० धावांचा डोंगर

- Advertisement -

उभारला आहे. पहिल्या दिवसाखेर संघासाठी सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने जबरदस्त फलंदाजी करत दीडशतकी भागीदारी केली व संघाचा डाव सावरला.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेत त्याने अर्धशतक लगावले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने दमदार शतक ठोकलं.

रोहित बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने पंतला साथीला घेत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रहाणेला मोईन अलीने ७६ व्या षटकात त्रिफळाचीत केले. रहाणे १४९ चेंडूत ६७ धावा करुन बाद झाला. त्यानंतर काही वेळात आर अश्विनही १९ चेंडूत १३ धावांवर जो रुटने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. डावाच्या ८३ व्या षटकात ऑली स्टोनने त्याचा झेल घेतला. यानंतर मात्र पंतने काहीसे आक्रमक खेळ केला. तसेच अक्षर पटेलला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला.

भारताकडून पहिल्या दिवसाखेर रिषभ पंत ५६ चेंडूत ३३ धावांवर नाबाद आहे. तर अक्षर पटेल ७ चेंडूत ५ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून पहिल्या दिवसाखेर जॅक लीच आणि मोईन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ऑली स्टोनने १ विकेट घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या