Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIND vs ENG 1st T20 : का झाला भारताचा पराभव?

IND vs ENG 1st T20 : का झाला भारताचा पराभव?

दिल्ली | Delhi

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने १५. ३ षटकांमध्ये १३० धावा करत अगदी सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाने दोन गडी गमावत आव्हान गाठलं आणि विजय मिळवला.

- Advertisement -

दरम्यान कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर पराभवाचे का झाला याच कारण सांगितलं आहे. विराट म्हणाला, ‘या प्रकारच्या खेळपट्टीवर आपल्याला काय करावे लागेल याबद्दल आम्हाला पुरेसे माहिती नव्हती. मला वाटते की आमच्या शॉट्सवर अंमलबजावणीचा अभाव आणि आम्हाला काहीतरी गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.’ तसेच ‘आपले दोष स्वीकारा, अधिक उद्दीष्टाने परत या, आपण फटका मारू इच्छित असलेल्या क्षेत्राचे स्पष्टीकरण घेऊन. आम्हाला पाहिजे असलेले फटके खेळण्याची परवानगी विकेटने दिली नाही.असाही तो म्हणाला.

श्रेयस अय्यरच्या अर्धशतकावर बोलतांना विराट म्हणाला, ‘श्रेयसने क्रीजचा वापर कसा करावा आणि बाऊन्स कसा खेळायचा हे दाखवले. इंग्लंडने आम्हला खालच्या स्तराची फलंदाजीची करायला भाग पडले. आम्ही काही गोष्टी पाहण्याचा विचार केला परंतु आम्हाला स्थिती मान्य करावी लागेल. जर खेळपट्टी अनुकूल असली तर आपण पहिल्या चेंडूपासून आक्रमक होऊ शकता. आम्ही मूल्यांकन करण्यासाठी पुरेसा वेळ घालवला नाही,श्रेयसने कामगिरी बजावली पण १५०-१६०धावसंख्या गाठण्यासाठी आम्ही बऱ्याच विकेट गमावल्या. असं तो म्हणाला.

दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर २ धावा असताना भरवशाच्या के. एल. राहुलला जोफ्रा आर्चरनं माघारी धाडलं. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनं देखील पॅव्हेलियनचा रस्ता धरला. भारताचा स्कोअर ३ धावांवर २ विकेट असा झाला होता. शिखर धवनला (४) देखील पाचव्या ओव्हरमध्ये भारताच्या २० धावा झालेल्या असताना वूडनं माघारी धाडलं. रिषभ पंत (२१) आणि श्रेयस अय्यर (६७) यांनी भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. १०व्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सनं पंतला बेयरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर हार्दिक पंड्या (१९) आणि श्रेयस अय्यर यांनी ५४ धावांची भागीदारी करत भारताला १००चा आकडा गाठून दिला. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूर(०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर (३) आणि अक्षर पटेल (७) यांनी भारताला १२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.

विजयासाठी १२५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं. यामध्ये सलामीवीर जेसन रॉयनं केलेल्या ३२ चेंडूत ४९ धावांचा मोठा वाटा होता. या खेळीमध्ये रॉयनं ३ सणसणीत षटकार आणि ४ चौकार लगावले. जेसन रॉय (४९) आणि जॉस बटलर (२८) या दोघांनी इंग्लंडला ७२ धावांची दणदणीत सलामी दिली आणि भारताच्या हातून सामना निसटल्याचं स्पष्ट झालं. आपला १०० वा सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलनं आठव्या षटकामध्ये जॉस बटलरला पायचीत करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ १२व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला पायचीत करून माघारी धाडलं. मात्र, तोपर्यंत या दोघांनी सामना इंग्लंडच्या खिशात आणून ठेवला होता. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आलेल्या डेविड मलान(२४) आणि जॉनी बेयरस्टो(२६) यांनी हातात आलेल्या इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या