Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाहिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास; ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी झाला सज्ज

हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास; ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी झाला सज्ज

बंगळुरु| Bangalore

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. बंगळुरु येथे एनसीएमध्ये रोहित शर्मानं फिटनेस चाचणी पास केली आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघाची चिंता मिटली आहे. त्यामुळं आता रोहित शर्मा लवकरच भारतीय संघात परतेल अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर महिन्यात ‘आयपीएल’दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर ‘एनसीए’चे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. ही फिटनेस चाचणी रोहित शर्मा पास झाला आहे.

१७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ पहिल्यांदाच परदेशात गुलाबी चेंडूवर सामना खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाला गेला तरी क्वारंटाईन?

सूत्राने सांगितले, ‘जर ते प्रवास करणार असतील तर त्यांच्यासाठी विलगीकरणाचे नियम कडक असतील. कारण ते व्यावसायिक विमानाने प्रवास करतील. कठोर विलगीकरण म्हणजे त्यांना पूर्ण संघासोबत विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या कालावधीत सराव करण्याची परवानगी राहणार नाही.’

आता केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच आपल्या सरकारची मनधरणी करीत त्यांना विलगीकरण कालावधीदरम्यान सरावाची परवानगी देऊ शकते. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रविवारी म्हटले होते की, ‘हे दोन्ही खेळाडू जर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाले तरच ते कसोटी मालिकेत खेळू शकतील.’

- Advertisment -

ताज्या बातम्या