Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIND vs AUS 3rd Test : सामना रंगतदार स्थितीत, भारताला विजयासाठी ३०९...

IND vs AUS 3rd Test : सामना रंगतदार स्थितीत, भारताला विजयासाठी ३०९ धावांची गरज

दिल्ली | Delhi

ऑस्ट्रेलियाविरुद्धीची सिडनी कसोटी ही सध्या रोमांचक स्थितीत पोहचली आहे. आज (रविवार) तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा

- Advertisement -

डाव ३१२/६ वर घोषित केला आणि भारतासमोर ४०७ धावांचं भलं मोठं लक्ष्य ठेवलं. याच डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३४ ओव्हरमध्ये २ गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात विजयसाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली. ७१ धावांच्या भागीदारी नंतर गिल ३१ धावांवर बाद झाला. रोहितने दमदार खेळ करत वर्षातील पहिलं अर्धशतक झळकावलं पण दुर्दैवाने एका उसळत्या चेंडू मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने ५२ धावांच्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा (९) आणि अजिंक्य रहाणे (४) या दोघांनी खेळपट्टीवर तग धरला. हेजलवूड आणि कमिन्सने १-१ बळी टिपला.

दरम्यान, चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात झाली. मार्नस लाबूशेनने आपलं सामन्यातलं दुसरं अर्धशतक झळकावलं. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथनेही आपलं सामन्यातलं दुसरं अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे धावगती वाढवताना बाद झाले. लाबूशेनने ७३ तर स्मिथने ८१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीन सुरुवातीला संयमी आणि नंतर आक्रमक खेळी करत ८४ धावा ठोकल्या. चहापानाच्या सुटीत यजमानांनी ६ बाद ३१२ धावांवर डाव घोषित केला. सैनी आणि अश्विनने २-२ तर सिराज, बुमराहने प्रत्येकी १ बळी टिपला.

- Advertisment -

ताज्या बातम्या