Friday, April 26, 2024
Homeक्रीडाInd vs Aus 1st Test : भारतीय संघाचा लाजिरवाणा विक्रम

Ind vs Aus 1st Test : भारतीय संघाचा लाजिरवाणा विक्रम

दिल्ली । Delhi

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाची दाणादाण उडाली. अॅडलेडमध्ये टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे. भारताचा डाव अवघ्या ३६ धावांवर आटोपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची ही नीचांकी धावसंख्या आहे. आता या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर अवघ्या ९० धावांचं माफक आव्हान आहे.

- Advertisement -

पहिल्या डावांत ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ वर डाव संपवलेल्या भारताकडे ६२ धावांची आघाडी होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची दयनीय अवस्था झाली.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं २९ धावांत ८ फलंदाज गमावले. यामध्ये मयांक अग्रवाल, विराट कोहली, पुजारा, रहाणे आणि साहा यांचाही समावेश होता. दुसऱ्या डावांत भारतीय संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारली. लाजिरवाणी बाब म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदच झालं आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ ढेपाळताना दिसला. दुसऱ्या डावात संघाने अत्यंत वाईट कामगिरी केली. यादरम्यान फलंदाज मोहम्मद शमी धाव करून दुखापतग्रस्त झाल्याने भारताने आपला डाव ३६ धावांवरच घोषित केला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ९० धावा करायच्या आहेत. भारताकडून पृथ्वी शॉ (४), मयांक (९), बुमराह (२), पुजारा (०). कोहली (४), रहाणे (०), विहारी (८), साहा (४), अश्विन (०), उमेश यादव (४ नाबाद) आणि शमी (१) यांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.

पॅट कमिन्स, जोश हेजलवूड या दुकलीने भारतीय संघाला खिंडार पाडत संघाची अवस्था दयनीय केली. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. कांगारुंकडून जोश हेजलवूडने ५ तर पॅट कमिन्सने ४ बळी घेतले.

यापूर्वी भारताने टॉस जिंकून फलंदाजी करत पहिल्या डावात २४४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या डावात १९१ धावांवर रोखलं. कमिन्सचा चेंडूवर हाताला लागल्यानंतर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला आणि भारताने आपला दुसरा डाव ९ बाद ३६ धावांवर घोषित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या