Thursday, April 25, 2024
Homeजळगाववाढीव वीजबिलांचा शॉक

वाढीव वीजबिलांचा शॉक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामध्ये सर्वच उद्योग धंदे बंद असल्याने सर्वच जणांनी आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

परंतु महावितरणकडून नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले अदा केली जात आहे. ही बिले बघून सर्वसामान्य नागरिकांना शॉक लागत असून या लॉकडाऊनमध्ये ही बिले कशी भरणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा कडक निर्बंधांमध्ये अत्यावश्यक सेवांना सूट दिली असून इतर सर्व व्यापार उद्योग दिड महिन्यांपासून बंद आहे.

लॉकडाऊमध्ये हाताला काम नसल्याने नागरिकांची आर्थीक घडी घडी विस्कटलेली असून अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.

यात अनेक बँकांचे हप्ते देखील थकीत झाले आहे. अशी परिस्थिती असतांना महावितरणकडून नागरिकांना सरसकट अंदाजीत सराररी बिलानुसार अव्वाच्यासव्वा बिले देण्यात आली आहे. नागरिकांची दोन वेळेच्या जेवणाची चिंता असतांना आता सर्वसामान्य नागरिक ही बिले कशी भरणार असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

वाढीव वीजबिलाचे संकट

पहिल्या लॉकडाऊनमध्ये देखील नागरिकांना अनेक महिने सरासरी अंदाजीत बिले बजाविण्यात आली होती. सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर त्यांना पुन्हा रिडींग प्रमाणे वीजबिले पाठविल्याने नागरिकांना वाढीव वीजबिलाचा भुर्दंड सहन करावा लागला होता. त्यावेळी अनेक नागरिकांनी थकीत बिले बीले भरुन टाकली होती. मात्र आता तशीच परिस्थिती महावितरणकडून तयारी करण्यात आली असून नागरिकांना या लॉकडाऊमध्ये देखील वाढीव बिले भरावी लागणार आहे.

अनेकांची बिले ही गहाळ

लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून नियमीत सरासरीनुसार ग्राहकांना बिले देण्यात आली आहे. अनेक घरे लॉकडाऊमूळे बंद असल्याने बिले वाटणार्‍यांनी नागरिकांची बीले ही त्यांच्या दरवाजाला अडविली होती. मात्र वार्‍या वादळाकडून ही बिले उडून गेल्याने नागरिकांना अद्याप बिले मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या