Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवांगी - ढोबळी मिरचीला सर्वाधिक भाव

वांगी – ढोबळी मिरचीला सर्वाधिक भाव

नाशिक । Nashik

जिल्ह्यात विविध भागात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पाऊसाने भाजीपाल्याचे नुकसान झाल्यानंतर आक्टोंबर महिन्यात परतीच्या पाऊसाने काही भागात नुकसान केले.

- Advertisement -

आता पाऊस गेल्यानंतर नाशिक मार्केेट कमेटीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. यात ठराविक भाजीपाला कमी झाल्यामुळे त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे.

यात विशेषत: वांग्याची आवक कमी झाल्याने प्रति क्विंटल 9 हजार व ढोबळी मिरची प्रति क्विटल भाव 8 हजारावर गेला आहे. हिरवी मिरची, पिकेटोर, गवार व गिलके यांना चांगला भाव मिळत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक दिवसानंतर 12 हजाराच्यावर भाजीपाला, फळांची आवक झाली आहे. मार्केट कमेटीतून मंगळवारी (दि.3) रोजी भाजीपाल्याची 169 वाहने रवाना झाली.

नाशिक जिल्ह्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस झाल्यानंतर आक्टोंबर महिन्यात परतीच्या पाऊसाने काही भागातील पिकांचे नुकसान केले. आता मात्र पाऊस परतल्यामुळे कोरडे वातावरण निर्माण होऊन शेतातील भाजीपाल्याच्या आवक वाढली आहे.

भाजीपाल्यात काही भाज्यांची आवक कमी झाल्याने भावास चांगली सुधारणा झाली आहे. यात वांगी, ढोबळी मिरची, टॉमेटा, गवार, हिरवी मिरची, दोडका, गिलके व कारले यांना चांगला भाव मिळत आहे. आता पाऊस परतल्याने हवामान कोरडे व भाजीपाल्यास पोषक असे निर्माण झाले आहे.

परिणामी भाजीपाल्याची आवक वाढली असुन मंगळवारी नाशिक मार्केट कमेटीत 14 हजार क्विंटल वर भाजीपाल्याची आवक झाली.

मंगळवारी (दि.3) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत वांगी प्रति क्विंटल 9 हजार रु. व ढोबळी मिरची (आवक 172 क्विंटल) सर्वाधिक असा 8 हजार 60 रुपये (आवक 205 क्विंटल) असा भाव मिळाला. त्यानंतर गवारला 5 हजार 500(आवक 8 क्विंटलड) इतका भाव मिळाला आहे.

तसेच दोडका 3750 रु(एकुण आवक 304 क्विंटल), गिलके 3125 रु.(एकुण आवक 193 क्विंटल), भोपळा 1000 रु.(एकुण आवक 1846 क्विंटल), टमाटा 2250 रु.(एकुण आवक 2120 क्विंटल) असा भाव मिळाला.

तर फ्लॉवर 2142 रु.(एकुण आवक 450 क्विंटल), कोबी 2915 रु.(एकुण आवक 830 क्विंटल), काकडी 750 रु.(एकुण आवक 1902 क्विंटल), भेंडी 3335 रु. (आवक 59 क्विंंटल) असा भाव मिळाला.

तसेच समितीत 3 आक्टोंबर रोजी रोजी कांद्याला प्रति क्विंंटल 4050 रु.(आवक 469 क्विंटल), बटाटा 3200 रु.(आवक 979 क्विंटल) आणि लसुन 9500 रु. (आवक 20 क्विंटल) असा भाव मिळाला.

नाशिक मार्केट कमेटीतून मंगळवारी मुंबई उपनगरे करिता 100, गुजरात 60, जळगांव 2, नागपुर 2, पुणे 1, औरंगाबाद 1 अशी 169 भाजीपाल्याची वाहने रवाना झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या