Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानिर्यातीसाठी द्राक्षबागांच्या नोंदणी संख्येत वाढ

निर्यातीसाठी द्राक्षबागांच्या नोंदणी संख्येत वाढ

नाशिक । विजय गिते Nashik

भारतीय फळे व भाजीपाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे परदेशातील फळे, भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतातून नोंदणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत वाढ होत असून हा आलेख वाढतच चालला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातून तब्बल 35 हजार 700 द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. तर देशभरातून 64 हजार 418 बागांची नोंदणी झालेली आहे. यावर्षी राज्यातून अधिकाधिक निर्यातीस चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा लक्षांक कृषी विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयांना दिलेला आहे.

सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये शेतकर्‍यांना निर्यातक्षम द्राक्षे, आंबा, डाळिंब, संत्रा व भाजीपाला पिकांची नोंदणी हॉर्टिनेट प्रणालीवर फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यास सुरूवात केली आहे.

परदेशातून शेतीमालाला मोठी मागणी आहे. त्यासाठी शेतीमाल रेसिड्यू फ्री असणे आवश्यक आहे. मागणीची पूर्तता करण्याकरिता मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

देशात कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांना नोंदणीसाठी कृषी विभागात जाण्यायेण्यासाठी अडचणी येत आहेत. त्या अडचणी येऊ नये म्हणून फलोत्पादन विभागाने अपेडामार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल अ‍ॅपद्वारे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी राज्य पातळीवर वेबिनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली होती.

या कार्यशाळेत नोंदणी कशी करावी, याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतकर्‍यांनी अँड्राईड मोबाईल अ‍ॅपमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅपद्वारे विकसित केलेला फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावा.

त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीत स्वतचे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड नंबर व ई-मेल आयडी ही माहिती भरल्यानंतर शेतकर्‍यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अधिकार्‍यांकडे अर्ज करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध होत आहे. यात काही अडचणी आल्यास जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे.

नोंदणीचे फायदे

द्राक्ष बागांची नोंदणी केल्यास निर्यातक्षम बागांची ओळख होते. निर्यातदाराला थेट पुरवठा करता येतो. यामुळे शेतमालाची विश्वासार्हता वाढते.तसेच कीडनाशक उर्वरित मुक्तची हमी देखील मिळते. निर्यातीसह, स्थानिक बाजारपेठेत थेट विक्री करता येऊन ग्राहकांमध्ये वेगळेपणा निर्माण होतो.

राज्यनिहाय द्राक्षबागांची नोंदणी

राज्य एकूण

महाराष्ट्र- 46,470

कर्नाटक- 10,395

गुजरात- 2685

आंध्र प्रदेश- 2468

उत्तर प्रदेश- 657

तामिळनाडू- 70

केरळ- 113

तेलंगणा- 1441

- Advertisment -

ताज्या बातम्या