Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील तापमानात वाढ; चटका असह्य

राज्यातील तापमानात वाढ; चटका असह्य

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना हवामानातील बदलांमुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे. मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर आता उन्हाचा चटका असह्य होऊ लागला असून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला आहे. राज्यात विदर्भातील पारा 38 अशांपर्यत जाऊन पोहचला आहे. उत्तर महाराष्ट्रकात 37 अशांपर्यत गेला आहे. नाशिक जिल्ह्यात आज 35.8 अंश सेल्सीअस कमाल तापमानांची नोंद झाली आहे. आता उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहे. तसेच जिल्ह्यातील किमान तापमान दिलासा दायक असुन रात्रीच्या सुखद गारव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.

- Advertisement -

गेल्या चार पाच दिवसात राज्यातील कमाल तापमानात सतत वाढ होऊ लागली असल्याने उन्हाळा खर्‍या अर्थाने जाणवू लागला आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली असल्याने तापमान असह्य बनु लागले आहे. विदर्भात पारा 38 अंशावर गेला आहे. मराठवाड्यात उन्हाच्या झळा बसु लागल्या आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे जिल्ह्यात 14.4 अंश नोंदविले गेले असुन त्याखालोखाल जळगांवला 15.7 व नाशिकला 16.1 अंशांची नोंद झाली आहे. औरंगाबादला 21 अंश असे किमान तापमानाची नोंद झाली असुन याठिकाणी उन्हाचा कडाका बसु लागला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान 17.6 आणि कमाल तापमान 38 अंश असे नोंदविले गेले आहे. नागपुरला 17.2 आणि कमाल तापमान 37 अंश असे नोंदविले गेले आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगांवला कमाल तापमान 36.8, नाशिकला 35.8 अंश नोंदविले गेले आहे. अशाप्रकारे राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवू लागल्याने जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. उन्हाळ्यातील दुसर्‍याच महिन्यात उन्हाचा झळा बसू लागल्या असून अजुन दोन महिने शिल्लक असल्याने नागरिक आत्ताच त्रस्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील तापमानाची स्थिती

दिनांक- कमाल तापमान -किमान तापमान

25 फेब्रुवारी- 34.1, 16.0 अंश सेल्सीअस

26 फेब्रुवारी 33.3, 15.5 अंश सेल्सीअस

27 फेब्रुवारी 35.5, 14.2 अंश सेल्सीअस

28 फेब्रुवारी 35.8, 16.1 अंश सेल्सीअस

- Advertisment -

ताज्या बातम्या