कर्करोगाच्या संख्येत दशकात विलक्षण वाढ : डॉ. राज नगरकर

jalgaon-digital
4 Min Read

बदललेली जीवनशैली, रसायनांचा भडिमार

नाशिक । प्रतिनिधी

रसायनांचा अतिवापर, कामाचे बैठे स्वरूप, बदललेली जीवनशैली, वाढणारे वजन, गुटखा, तंबाखू, मद्याची वाढती व्यसनाधीनता या महत्त्वपूर्ण कारणांसह रोगाबद्दल असलेल्या जागरूतेचा अभाव यामुळे गेल्या दशकाच्या तुलनेत या दशकात कर्करोगींच्या संख्येत विलक्षण वाढ झाली. कॅन्सरबाबत जागृती वाढण्याची गरज असून प्रथम स्टेजमध्ये कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण अवघे 1 ते 2 टक्के आहे. कर्करोगाशी लढा देण्यासाठी एचसीजी मानवता सेंटरमध्ये प्रिव्हेंटीव्ह कॅन्सर विभागात मोफत प्रतिबंधात्मक उपचाराबरोबरच विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध अँकॉलॉजिस्ट डॉ. राज नगरकर यांनी दिली.

4 फेब्रुवारी जगभर जागतिक कॅन्सर प्रतिबंध दिन म्हणून साजरा होतो. या औचित्यावर कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. नगरकर यांनी ही माहिती दिली. प्रतिवर्षी 10 ते 12 लाख रुग्णांना कर्करोगाचे निदान होत आहे. तितकेच रुग्ण यामुळे दगावतात, असे सांगून डॉ.नगरकर यांनी या रोगाविषयी अधिक जागृतीच्या गरजेवर भर दिला. भारतामध्ये कुठल्याही घडीला 40लाख कर्करोगी आढळतात.

या आजाराविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी जागतिक कर्करोग निवारण दिन सुरू करण्यात आला. यंदा त्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या दिनाचे औचित्य साधून विशेष अभियान हॉस्पिटल तर्फे सुरू करण्यात आला असल्याचे ते म्हणाले, कर्करोगाचे निदान व्हावे, तसेच निरोगी व्यक्तीमध्ये कर्करोगाचा धोका नाही, हे तपासण्यासाठी विशेष विभाग स्थापन केला असून त्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केल्याची माहिती त्यांनी दिली.

महिलांमध्ये स्तनाचा तसेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्त्रीला स्वत: कॅन्सरची गाठ ओळखता यावी, म्हणून‘मेरर योजना’ हॉस्पिटलमध्ये सुरू केली असे त्यांनी सांगितले. आरोग्य सहेली या महिलांमध्ये कर्करोगाची जागृती करण्यार्‍या अभियानात सन 2017-18 यावर्षी दहा हजार महिलांची स्क्रिनिंग करण्यात आली करण्यात आल्या असेही त्यांनी नमूद केले.

बालके, स्त्रिया आणि तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण विलक्षण वाढले आहे. एचसीजी मानवता सेंटरमध्ये वर्षभरात 36 हजार स्त्रियांची मोफत तपासणी करण्यात आली.आरोग्य सहेली उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सन2019-20. सन2019-20 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत9 हजार 664 स्क्रिनिंग करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कर्करोगाची वाढती संख्या

कर्करोगावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये सन 2017-18 या काळात रुग्णांवर 4 हजार 24 शस्त्रक्रिया, 1 हजार 620 रेडिएशन उपचार करण्यात आले. याच वर्षी बाह्यरुग्ण विभागात 10 हजार 417 नव्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सन 2018-19मध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यावर्षात 18 हजार 108 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. तर 1 हजार 755 रुग्णांनी रेडिएशन घेतले. सन 2018-19मध्ये त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत रेडिएशन घेतलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसले. यावर्षी 176 हजार 55 रुग्णांनी रेडिएशन उपचार घेतले, तर डिसेंबर 2019 अखेर 1 हजार 455 रुग्णांनी रेडिएशन घेतले.

बदललेल्या लैंगिकतेने मुख कर्करोग

तरुणांमध्ये पॉर्नफिल्म पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, असे सांगून डॉ. नगरकर म्हणाले. पॉर्नफिल्ममुळे लैंगिक आवडीत बदल झाला. बकल क्वाईटीस(मुखमैथुन)आणि अनैसर्गिक समागम(सोडोमी) हे कर्करोग होण्याच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणून पाहणीत समोर आले आहे. बदलत्या लैंगिक आवडीमुळे तरुणाईमध्ये मुखाचा आणि गुदद्वाराच्या कर्करोगात वाढ झाल्याचे विदेशातील सर्वेक्षण अभ्यासात समोर आले. भारतीय पद्धती, परंपरा सर्वश्रेष्ठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शस्त्रक्रिया, किमोथेरपी

सन 2017-18 4 हजार 24,13 हजार 821 (किमोथेरपी)
सन 20018-19 5 हजार 665, 16 हजार 178 (किमोथेरपी).
सन 2019-20(डिसेंबर) 4 हजार 768, 12 हजार 805 (किमोथेरपी)

Share This Article