Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपुलाअभावी गैरसोय

पुलाअभावी गैरसोय

कालवण | देविदास कामडी | Kalwan

तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी (farmers), ग्रामस्थ, शिक्षक (teachers) व विद्यार्थ्यांना (students) गिरणा नदीपात्रातून (girna river) स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतात,

- Advertisement -

शाळेत तसेच कामानिमित्त गावात जावे लागत आहे. गिरणा नदीस (girna river) आलेल्या पुरामुळे (flood) नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याने गिरणा नदीपात्रावर पुलाचे बांधकाम (Construction of a bridge) तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांसह, ग्रामस्थ, विद्यार्थी करत आहे.

गिरणा धरण (girna dam) 100 भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. दररोज दहा ते पंधरा हजार क्यूसेक गिरणा नदीपात्रातून वाहत आहे. यामुळे नदीतील पाण्याची, पातळी मोठ्या प्रमाणात वाढून – धोकादायक बनल्याने शेतकर्‍यांना. शेतातील गुरांना चारा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. गिरणा नदी (girna river) पात्रातून प्रवास करीत असताना वारंवार जीवघेणे ठरत आहे.

दरम्यान, बोराळे शेतकरी राजेंद्र चंदिले आपला शेतात वेचून ठेवलेला कापूस आणण्यासाठी पाण्याने उघडकीस दिल्यामुळे घरी आणण्याचा प्रयत्न करीत असतात तेे आणि मुलगा, पत्नी त्याची बैलगाडी, बैल,दोन जण नदी प्रवाहात वाहत असताना स्थानिक नागरिकांनी या सर्वांना वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बोराळे गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती (farming) असून 500 हेक्टर क्षेत्र हे पलीकडच्या बाजूला आहे.

शंभरापेक्षा अधिक नागरिक, शेतकरी हे गिरणा नदीच्या पलीकडच्या बाजूला राहतात व पूर्ण गावाच्या शेती जलसिंचनाच्या (Agricultural irrigation) विहिरी (well) या नदीच्या पलीकडच्या बाजूला आहेत त्यामुळे रोज नदीपात्रात उतरून शेतीपंप चालू करण्यासाठी व शेतात काम करण्यासाठी जावे लागते. शेतीसाठी लागणारे मजूर सुद्धा रोज आपला जीव मुठीत धरून गिरणा नदीच्या पात्रात नदीपलीकडे धनगर समाजाची 500 लोकांची वस्ती आहे. येथे असलेल्या जि.प. वस्ती शाळेवर जाणा-या शिक्षकांनासुद्धा रोज -नदीच्या पात्रात उतरून जावे लागते.

शेतकर्‍यांना शेतीचा माल काढण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागतो. गिरणा नदीस आलेल्या पुरातून गावाच्या दुसर्‍या – बाजूस जीव धोक्यात घालून जावें : लागत असल्याने आतापर्यंत बैलगाडीचा अपघात होण्याच्या आठ ते घटना घडल्या असून त्यामध्ये शेतकर्‍यांचा व बैलांचा देखील मृत्यू झालेला आहे. 1972 ते 2020 पर्यंत आठ शेतकरी (farmers) नदीपात्रात वाहून गेलेले असून, पाच ते सहा शेतकर्‍यांना वाहत असतांना गावातील तरुणांनी ’वाचवले आहे.

बोराळे येथील शेतकरी राजेंद्र चंदिले आपला शेतात वेचून ठेवलेला कापूस पाण्याने उघडकीस दिल्यामुळे घरी आणण्याचा प्रयत्न करीत असताना पाणी पण कमी होते. गाडी बैलावर चार क्विंटल कापूस घेऊन नदीपात्रातून येत असताना गाडी बैल पलटी झाली. नदीपात्रात बैलगाडी पलटी झाली त्यात कापूस वाहून गेला. तर बैलांना फाशी लागली. गावातील काही तरुणांना हे समजतास त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. अपघातग्रस्ताना वाचवले. पलटी झालेली गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या ठिकाणी मृत्यूचे तांडव नेहमी घडत असताना संबंधित विभाग येथे पूल (bridge) बांधवा, अशी मागणी वाढलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या