Thursday, April 25, 2024
Homeनगरउपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची शिफारस

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची शिफारस

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

सहकारी साखर कारखान्यांना आयकराच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या

- Advertisement -

अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या शिफारसपत्रात साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आयकर विषय अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे.

आयकर विभागाने सहकारी साखर कारखान्यांकडे 10 कोटी ते 200 कोटी रुपयांपर्यंत आयकर रकमेची मागणी केलेली आहे. सदरची रक्कम अंदाजे 5100 कोटी रुपये इतकी होत असल्याचे खासदार शरद पवार यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट , पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये नमूद केले. सदरचा विषय गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सहकारी साखर कारखान्यांच्या आयकर दाव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन न्यायमूर्तीच्या बेंचपुढे सुनावणी होऊन दि.5 मार्च 2019 रोजी निकाल लागला आहे.

खासदार शरदचंद्रजी पवार यांनी साखर उद्योगापुढील आयकर दाव्याच्या अनुषंगाने साखर संघाला समिती नेमण्याबाबत सूचना केली आहे. परंतु ऊस दराला अंतिम मान्यता शासनस्तरावर मिळत असल्या कारणास्तव सदर विषयासंबंधी समितीचे गठण शासनस्तरावर व्हावे असे वाटते. सदर काळापासून सहकारी साखर कारखान्याचा शासनाने मान्य केलेला ऊस दर, त्यास अनुसरून साखर कारखान्यांनी कमी जास्त अदा केलेल्या रकमा, शासनस्तरावरून सदर अदा केलेल्या रकमांना द्यावयाची मान्यता, असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष श्री.जयप्रकाश दांडेगावकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या शिफारस पत्रात म्हटले आहे की, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा.शरद पवार यांच्या सुचनेनुसार आयकर विषयाच्या अनुषंगाने शासन स्तरावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी व सदर समितीमध्ये

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (अध्यक्ष), ना. जयंत पाटील, ना. बाळासाहेब थोरात, ना. दिलीप वळसे पाटील, ना. राजेश टोपे, ना. अशोकराव चव्हाण, ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभूराजे देसाई, जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघ उपाध्यक्ष श्रीराम मोटे, साखर संघ उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, साखर संघ संचालक हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्रकाश नाईकनवरे, संजय खताळ, प्रसन्ना जोशी, शैलेंद्र जैस्वाल यांचा समावेश करावा या शासन स्तरावरील समितीने सहकारी साखर कारखान्यांचा आयकर विषयी प्रश्न मार्गी लागण्यासाठी सहकार्य करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या