नेवाशात घडलेल्या घटनेचा योग्य तो तपास करणार

jalgaon-digital
3 Min Read

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

रामनवमी च्या पूर्व संध्येला नेवासा शहरात झालेल्या घटनेचा योग्य तो तपास करणार तसेच सायबर क्राईमचे संपूर्ण नेवासा शहरातील सोशल मीडियावर लक्ष असून दोन्ही समाजीतील ज्येेष्ठ नागरिकांनी तरुणांना योग्य पद्धतीने समजावून सांगावे जेणेकरून कायदा सुव्यवसस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. समाजात जर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशांवर कायदेशीर कारवाई करू तसेच रामनवमी मिरणूक घटनेत पोलिसांची भूमिका पारदर्शक राहील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

दि 13 रोजी सायंकाळी रामनवमी मिरणूक प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल , श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवंगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आदी उपस्थित होते .

मनोज पाटील म्हणाले की यावेळी दोन्ही समाजने समजूतदारपणाने समंजस भूमिका घेऊन शांतता प्रस्तापित करण्यासाठी प्रशासनाला जे सहकार्य केले ते अभिनंदनिय आहे. शहरातील नागरिकांन कडे चांगुल पणाची शिदोरी होती म्हणून अप्रिय घटना घडली नाही नाव वाईट होण्यास वेळ लागत नाही. चांगले नाव होण्यास वेळ लागतो. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी घडतात.

तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये. या संदर्भात पोलिसांची करडी नजर आहे. या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. घडलेली घटना अतिशय निंदनिय आहे. अशा वाईट प्रवृत्तीचा आम्ही मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध करतो. बाहेरगांवचे समाजकंटक येऊन हा प्रकार करतात. पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जावे, असे मुस्लिम नेते अल्ताफ पठाण यावेळी म्हणाले.

माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले, यापर्वीही अशा घटना घडल्या आहेत तरी देखील नेवासा शहरात एकोपा आहे. काही चुकीच्या लोकांमुळे अशा घटना घडतात. तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी. मौलाना इब्तेहाजुदिन, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी, महेश मापारी, प्रताप चिंधे, विकास चव्हाण, संतोष गव्हाणे आदींनी यावेळी घटने संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले

यावेळी सादिक शिलेदार अनसार पठाण, विलास चव्हाण, रायभान कोरडे, साईनाथ शिरसाट, गौतम बनकर, विकी बनकर राजेंद्र पंडित, जुमाखान पठान, रवी आल्हाट, इमरान दारूवाला साजित पठान शिवा राजगीरे, नितीन भालेराव, संदीप आलवणे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

शांतता कमिटी बैठकीनंतर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की गुन्हा दाखल करून आरोपी अटक केले आहे. घटनेच्या मुळाशी जाऊ. उद्यापासून होणार्‍या महापुरुषांच्या जयंत्या तसेच रमजान ईद देखील सुरू आहे, सर्वांनी शांतता बाळगावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *