Thursday, April 25, 2024
Homeजळगावबिस्कीट पुड्याच्या बहाण्याने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

बिस्कीट पुड्याच्या बहाण्याने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहरातील आनंदवाडी भागात एकाच्या घरी आलेल्या दुरच्या नातेवाईक २७ वर्षीय तरुणाने, घरातील चार वर्षी चिमुरडीला ‘ बिस्कीटचा पुडा ’ घेवून देता असे सांगून निर्जनस्थळी नेत तिच्यावर अमानूषपणे अत्याचार केला. हि घटना दि,२८ रोजी मध्यरात्री १.२५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कतरिना-विकी लग्नातूनही असे मिळवणार पैसे

१६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर दोघां तरुणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा शहरात आठ दिवसात दुसरी बलात्काराची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून चिमुरडीवर अत्याचार करणार्‍याला फाशी देण्याची मागणी विविध संघटनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान आरोपीला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला असून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

शहरातील आनंदवाडी भागात एकाच्या घरी सावळाराम भानुदास शिंदे(२७) रा. लोंढरे ता.नांदगाव, जि.नाशिक हा नातेवाई आला होता. घरी नातेवाई आल्यामुळे त्याचा आदरतिथ्य करण्यासाठी रात्री त्याला जेवण-खावण झाले. त्यानतंर त्याने घरातील चार वर्षीय चिमुरडीला बिस्कीटा पुडा खायला घेवून देतो असे सांगून सोबत नेले. व रेल्वे स्टेशनच्या बाजुस निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अमाणूषपणे अत्याचार केला. नंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आल्याने मातेने आरडाओरड केली. त्यामुळे सावळाराम भानुदास शिंदे( २७) पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच, लोकांनी पकडून त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांना स्वाधीन केले. पोलिसांनी चिमुररडीला चाळीसगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय दाखल केले असता, वैद्यकिय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी बालिकेवर अत्याचार झाल्याचे सांगत बालिकेला इजा झाल्याने तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चिमुरडीच्या आईच्या फिर्यादीवरुन सावळाराम भानुदास शिंदे याच्या विरोधात भादवी कलम ३६३ सह विविध कलमान्वय गुन्हां दाखल करण्यत आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहेत.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

आठवड्याभरात दुसरी घटना

१६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला दि,२२ रोजी मोटरसायकलवर बसवून शहरालगत असलेल्या करगाव रोड परिसरात निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्या अजाणपणाचा फायदा घेत, पडीत घरात नेऊन संशयित आरोपी शेख सलिम शेख वजीर व हमीद बिरीम पिंजारी दोघे राहणार सुवर्णाताई नगर, चाळीसगाव यांनी तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा चिमुरडीवर आज मध्यरात्री अत्याचाराची घटना घडल्यामुळे शहरात नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. चिमुरडीवर अत्याचार करणारी घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून आरोपीला फाशी देण्याची मागणी विविध समाजीक संघटनाकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या