Friday, April 26, 2024
Homeनाशिकनांदूरशिंगोटेत अभ्यासिकेचे उद्या लोकार्पण

नांदूरशिंगोटेत अभ्यासिकेचे उद्या लोकार्पण

नांदूर शिंगोटे । Nandur Shingote (वार्ताहर)

नांदूरशिंगोटे येथे तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिली अद्ययावत क्रांतिवीर वसंतराव नाईक अभ्यासिका बांधून पूर्ण झाली आहे. उद्या (दि. 21) सकाळी 9 वाजता शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती सरपंच गोपाळ शेळके यांनी दिली.

- Advertisement -

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमास खा. हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या निधीतून व युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून ही अभ्यासिका उभी राहिली आहे.

किमान एक हजारावर युवकांना या अभ्यासिकेचा लाभ होऊ शकेल. सदर कार्यक्रम फेसबूकवर पाहता येणार असल्याचे सरपंच गोपाल शेळके यांनी सांगितले.

युवकांना करिअरची संधी

स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात नोकरी करण्याची इच्छा असूनही अनेक युवकांना सुविधा व मार्गदर्शनाअभावी शक्य होत नाही. इच्छा असूनही आर्थिक स्थितीमुळे स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करता येत नाही.

अनेकांना मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणे शक्य होत नाही. या अभ्यासिकेमुळे युवकांच्या समस्या सुटणार आहेत. त्यामुळे परिसरातील युवकांना ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

पहिली अद्ययावत अभ्यासिका

तालुक्यातल्या ग्रामीण भागातील पहिली अद्ययावत अभ्यासिका म्हणून या अभ्यासकीकडे पाहिले जात आहेत. एकाच वेळी 150 विद्यार्थी बसू शकतील अशी व्यवस्था यात आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रोजेक्टरसह अद्ययावत सभागृहाची यात सुविधा आहे.

स्पर्धा परीक्षांची पुस्तके ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र आसन व्यवस्थेसह कंपार्टमेंट करण्यात आले आहेत.

इमारतीचे बांधकामही पंचतारांकित स्वरूपाचे आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार असल्याने आता मोठा खर्च करून शहरात जावे लागणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या