Wednesday, April 24, 2024
Homeधुळेश्रीराम जन्मभूमी निधी समर्पण समिती कार्यालयाचे उद्घाटन

श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण समिती कार्यालयाचे उद्घाटन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

अयोध्या येथे प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी प्रत्येक तालुक्यात समितीची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील फागणे येथे समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन स्वामिनारायण मंदिराचे आनंदजीवन स्वामी, रोकडोबा देवस्थानाचे प्रमुख महंत विष्णूदास महाराज, अर्जुनदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी समाजाने मंदिर निर्माणासाठी सरळ हाताने निधी द्यावा, असे आवाहन करण्यात केले.

अयोध्या येथे निर्माण होणारे राम मंदिर हे केवळ मंदिर नसून ते राष्ट्रमंदिर आहे. मंदिराच्या निर्माणामध्ये समाजातील सर्व घटकांचे योगदान असले पाहिजे व हे मंदिर केवळ एका जाती-धर्मापुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण राष्टाचे झाले पाहिजे, असा श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या ट्रस्टचा मानस आहे.

त्या अनुषंगाने देशभरातील प्रत्येक घराचा प्रत्येक व्यक्तीचा संपर्क व्हावा, अशी योजना करण्यात आली आहे. देशातील जन सामान्याचे मंदिर निर्माणासाठी व्यापक योगदान असले पाहिजे, यासाठी प्रत्येक तालुक्यातील समितीचे गठण करण्यात आले आहे.

दि. 15 जानेवारी ते दि. 15 फेब्रुवारी 2021 या कालावदित निधी समर्पण संकलनाचे अभियान राबवण्यात येणार आहे.

धुळे (ग्रामिण) तालुक्यात देखील यासाठी एक सर्वसमावेशक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी सैनिक विश्वास अहिरे, प्रगतशिल शेतकरी भटू पाटील, नामदेव नाईक, भिका पवार, शिरीष सुर्यवंशी, अशोक वाघ, भालेराव सुर्यवंशी तसेच अभियान समितीचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंम सेवक संघांचे स्वयंम सेवक व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या