Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारजिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राचे उद्घाटन

जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राचे उद्घाटन

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

येथील जिल्हा न्यायालयात ई-सुविधा केंद्राचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्या.प्रमोद तरारे यांच्या हस्तेे करण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रमास मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण,जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव एस.टी.मलिये,प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी.पाटील,जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.के.एच.सावळे,जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.एस.पी.पंडीत अदि उपस्थित होते.

सदर ई-सेवा केंद्रामध्येे विधीज्ञ,व पक्षकार यांचे सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यांत आलेल्या आहेत.

त्यांत प्रामुख्यांने न्यायालयीन प्रकरणांची स्थिती,नकलेचे ऑनलाईन अर्ज,ई-फायलिंग सुविधा,ई-पेंमेट,डिजीटल स्वाक्षरी,ई-कोर्टाचे मोबाईल अ‍ॅप,न्यांयालयीन प्रकरणांचा निकाल ऑनलाईन प्राप्त करणे,तसेच ई-कोर्ट प्रोजेक्ट् अंतर्गत येणा-या सर्व प्रकरणांचे व समस्याांचे निराकरण करणे इत्याादी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या