Friday, April 26, 2024
Homeक्रीडाराज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत नाशिक द्वितीय

राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत नाशिक द्वितीय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील हौशी रोप स्किपिंग असोसिएशन (महाराष्ट्र) आणि क्रीडा भारती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी राज्यस्तरीय रोप स्किपिंग अजिंक्यपद स्पर्धा (Rope Skipping Championship Competition) आयोजित करण्यात आली होती. यात 27 सुवर्ण, 20 रौप्य तर 16 कांस्यपदक जिंकत नाशिक जिल्ह्याने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.

- Advertisement -

हौशी रोप स्किपिंग असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या स्पर्धेत राज्यभरातून 563 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत 21 जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा 11, 14, 17 खुला गट मुले-मुली या वयोगटात घेण्यात आली. या चार वयोगटातील मुले व मुली मिळून आठ गटात व विविध खेळ विभागात एकूण 63 मेडल (27 सुवर्ण, 20 रौप्य तर 16 कांस्य) जिंकत नाशिक जिल्ह्याने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. प्रथम क्रमांक अहमदनगर जिल्हा आणि तृतीय क्रमांक गोंदिया जिल्ह्याने मिळवला.

बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी विजय पुरंदरे, आ. राहुल ढिकले, नाईक शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत धात्रक, के.के. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ, शेखर कुलकर्णी, साहेबराव पाटील, हौशी रोप स्किपिंग संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेखा पाटील, महाराष्ट्र मिक्स नेटबॉल संघटनेचे सरचिटणीस स्वप्नील करपे, स्पर्धा संयोजक सुनील निरगुडे व आयोजक सचिव पवन खोडे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल विसावे, स्नेहल देव, कामिनी केवट, मंजिरी पाटील, शैलजा जैन, क्षितिजा खटावकर, सोनाली कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या