Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

करोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात (Nashik Division) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे….

- Advertisement -

विभागातून आजपर्यंत 9 लाख 48 हजार 32 रुग्णांपैकी 9 लाख 21 हजार 847 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 6 हजार 958 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 170 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे, तर मृत्यूदर 2.02 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ (Dr. P. D. Gandal) यांनी दिली.

विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 59 लाख 99 हजार 685 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 48 हजार 32 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आजपर्यंत 4 लाख 4 हजार 405 करोनाबाधित (Corona Positive) रुग्ण आढळले असून 3 लाख 94 हजार 826 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

तसेच 1 हजार 22 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.

अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) आजपर्यंत 3 लाख 14 हजार 759 बाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 2 हजार 440 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 5 हजार 899 बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के इतका आहे. आजपर्यंत 6 हजार 420 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.03 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात (Dhule District) आजपर्यंत 45 हजार 848 बाधित रुग्ण आढळले असून 45 हजार 123 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 5 बाधित रुग्ण उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.45 टक्के आहे.

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) आजपर्यंत 1 लाख 42 हजार 675 बाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 40 हजार 66 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 32 बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.80 टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) आजपर्यंत 40 हजार 345 बाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 392 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात एकाही बाधित रुग्णांवर उपचार सुरु नसून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के इतके आहे. आजपर्यंत 950 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.35 टक्के आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या