Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८० रूग्णांची करोनावर मात

जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६८० रूग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट आली असून करोना मुक्त होणारांचे प्रमाण 93.93 टक्केंवर पोहचले आहे. मागील चोवीस तासात 680 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 50 हजार 555 चा आकडा पार केला आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत मोठी घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

आज पुन्हा पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसभरात 1 हजार 73 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मृत्युमुखी पडणारांचे प्रमाण मात्र कायम असून आज 32 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 1 हजार 73 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 613 इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील 437 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात 5 रूग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील करोना रूग्णांचा आकडा 3 लाख 73 हजार 210 इतका झाला आहे.

करोना मृत्यूचे प्रमाण कायम असून ग्रामिण भागात हे प्रमाण अधिक आहे. आज जिल्ह्यात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील 15 रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील 16 व मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 4 हजार 162 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 1 हजार 394 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 1 हजार 183 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये घट आली असून हा आकडा आता 18 हजार 493 इतका झाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,73,210

* नाशिक : 2,18,235

* मालेगाव : 12,148

* उर्वरित जिल्हा : 1,37,746

* जिल्हा बाह्य ः 5,081

* एकूण मृत्यू: 4,162

* करोनामुक्त : 3,50,555

- Advertisment -

ताज्या बातम्या