Thursday, April 25, 2024
Homeधुळेमहापालिका प्रशासन ढिम्म, आयुक्तांची पकड नाही

महापालिका प्रशासन ढिम्म, आयुक्तांची पकड नाही

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मनपा प्रशासनासह ठेकेदार आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांवर बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

प्रशासनाकडून अपेक्षीत उत्तर मिळत नसल्यामुळे डॉ.भामरे यांनी संताप व्यक्त करून प्रशासन ढिम्म झाले असून आपली प्रशासनावर पकड नाही असे आयुक्तांना यावेळी सुनावले.

अक्कलपाडा पाईपलाईन योजनासह विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. भामरे हे बोलत होते.

या बैठकीला खा.डॉ.भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त अजीज शेख, स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे, विरोधी पक्षनेते साबीर शेख, उपमहापौर सौ.कल्याणी अंपळकर यांच्यासह मनपा प्रशासनातील अधिकारी नगरसेवक तसेच बांधकाम विभागाचे अभियंता एजाज शाह, मजीप्राचे अधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना ही धुळे शहरासाठी महत्वकांक्षी योजना असून या योजनेबाबत जनतेला शब्द दिला आहे. योजना वेळेवर पूर्ण झाली तर धुळेकरांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

मात्र योजना पुर्णत्वास येईपर्यत मनपाने पाणीपुरवठ्याचे काय नियोजन केले आहे. असा प्रश्न खा. भामरे यांनी उपस्थित केला.

सद्यःस्थितीत शहराला तापी पाणीपुरवठा हनुमान टेकडी, डेडरगाव तलाव या स्त्रोतांमधून 50 टक्के पाणी वापरले जात आहे. वितरणाची व्यवस्था जुनी आहे.

अनेक ठिकाणी जलवाहिनीचा प्रश्न आहे. पाणी पुरवठ्यासाठी झोनींग करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला असून निविदा तयार केली आहे. 15 दिवसात निविदा प्रसिध्द होईल त्यानंतर काम केले जाईल असे अभियंता कैलास शिंदे यांनी सांगितले.

अनुप अग्रवाल यांनी निविदेच्या कामावर आक्षेप घेतला. अभ्यासू व्यक्तींच्या माध्यमातून निविदा का बनविली नाही. तुमच्या भोंगळ कारभारामुळे जनता रोष व्यक्त करतात, असे डॉ. भामरे यांनी सुनावले.

एक्सप्रेस फिटर असून देखील वीज कंपनी वीज देत नाही, वीज कंपनीने बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप अनुप अग्रवाल यांनी केला. यावर एक्सप्रेस फिडरचे कनेक्शन असतांना देखील वलवाडी फिटर दोन वर्षांपासून बंद आहे.

अनेक वेळा बैठकीला बोलविले. मात्र विज कंपनीतील संबंधित बैठकीला येत नाही. दीड कोटी रुपये दरमहा मनपा वीज बिल भरते असे अभियंता शिंदे यांनी सांगितले.

जीपीएस सीस्टीम का बसविली नाही यावर अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी ठेकेदार उडवा उडवीचे उत्तरे देतो.कचरा विलगीकरणाचे काम सुरुवातीला चार-सहा महिने झाले. त्यानंतर कामाकडे दुर्लक्ष झाले.त्यावर डॉ.भामरे यांनी स्वच्छतेत तिसरा नंबर धुळ्याचा कसा आला.

यावर आयुक्तांनी मध्यस्थी करत सांगितले की, कचरा ठेकेदाराला नोटीसा दिल्या,दंड आकारला ब्लॅक लिस्टची अंतिम नोटीसही दिली. म्हणणे मांडण्यासाठी ठेकेदाराला शुक्रवार पर्यत मुदत दिली होती.त्यांनी लेखी म्हणणे मांडले आहे. त्यावर आता कारवाई होईल. असे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या