Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआंतरराष्ट्रीय युवा विकास प्रकल्पात नाशिकच्या युवकांची छाप

आंतरराष्ट्रीय युवा विकास प्रकल्पात नाशिकच्या युवकांची छाप

नाशिक । प्रतिनिधी

विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्राच्या वतीने राबवण्यात आलेल्या युवा विकास प्रकल्पात तसेच भारत-युरोप मंडळाचे सदस्य व शिवालय नृत्यकला मंदिराच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत छाप पाडली.

- Advertisement -

सध्या विषाणू संक्रमणाच्या स्थितीत ऑनलाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात विविध देशातील युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व एकात्मतेसाठी सद्यस्थितीतील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर युवकांना जागृत करून त्यांना सक्षम नागरिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विविध विषयांचे शिक्षण झालेल्या, भाषा व कला कौशल्य असलेल्या अभ्यासू युवकांची निवड करण्यात आली. युरोप खंडातील फ्रान्स व पोलंड, आफ्रिकेतील ट्युनिशिआ, मोरक्को, आयवरीकोस्ट व आशियातील भारत देशातील युवक-युवतींची निवड करण्यात आली होती.

भारत देशाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी नाशिकच्या विश्व शैक्षणिक-सांस्कृतीक केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. दीपक मगरे यांच्या नेतृत्वाखाली श्वेता मगरे- पांडे, सरीता कारोळे- आंग्रे, ऐश्वर्या पवार आणि संदीप पांडे यांची निवड करण्यात आली होती.

फ्रान्सच्या प्रतिष्ठीत अशा अमसेद इंटरनॅशनल आणि पोलंडच्या इ. एस. डी. या सेवाभावी संस्थांनी ट्युनिशियाच्या आवेक, मोरक्कोच्या चिल्ड्रेन अ‍ॅन्ड युथ ट्रस्ट आयव्हेरी कोस्टच्या युथ फाऊंडेशन तसेच नाशिकच्या भारत-युरोप मंडळ, विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्राच्या सहभागातून हा विशिष्ट प्रकल्प राबवला.

या प्रकल्पात ‘आंतरराष्ट्रीय नागरिकता आणि सहजीवन’, ‘कोव्हिड विषाणू महामारीचे आव्हान’, ‘शाश्वत विकासाची ध्येय’, ‘आंतरराष्ट्रीय एकात्मता आणि युवा सहभाग’, ‘आंतरसांस्कृंतिक मूल्यांचे महत्त्व’ आदी विषयांचा समावेश होता. या विषयांवर निवडलेल्या युरोपीय, आफ्रिकन व भारतीय युवा प्रतिनिधींनी हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि अरेबीयन आदी भाषांतील संभाषण कौशल्य व वरील विषयाच्या ज्ञानाआधारे हिरीरीने सहभाग नोंदवला. नाशिकच्या या युवकांनी आपल्या वाक्चातुर्याने चांगलीच छाप पाडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या