राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिकसाठी ‘हा’ महत्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai

येथे मंत्रालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून नाशिकसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे…

नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या (Government Teachers College) मुलींच्या वसतीगृहाकरिता (Hostel) भाडे तत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठीचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. नाशकातील मुलींचे शासकीय वस‍तीगृह ज्या जागेत आहे त्या जागेतील २४८५ चौरस मिटर क्षेत्र वसतीगृहाच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात आहे.

तसेच या ठिकाणी वसतीगृहाचे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढे म्हणजेच ११९० चौरस मिटर चटईक्षेत्राचे बांधकाम जमीन मालकाने करून द्यावे आणि त्यासाठी शालेय शिक्षण विभागास (School Education Department) ५८२ चौ.मि. इतकी जागा कायम स्वरुपी मालकी तत्त्वावर वर्ग करण्यात यावी अशा स्वरुपाच्या काही अटी व शर्ती या करारात असणार आहे.