Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमहत्व कार्तिक पोर्णिमेचे.....

महत्व कार्तिक पोर्णिमेचे…..

शास्त्री भक्तीस्वरूपदासजी

कार्तिक शुद्ध एकादशी ला चातुर्मास समाप्त होतो त्या दिवसाला आपन देवउठि ( प्रबोधनी ) एकादशी म्हणतो आज पासून तर पौर्णिमे पर्यंत तुलशी विवाह सोहळा शुरू होतो. कार्तिक महिन्यामध्ये अखंड दिप दानाच खुप महत्व आहे .

- Advertisement -

संपूर्ण खानदेश मधे आजही प्राचीन मंदिरां मधे प्रातः समयी हरि नाम स्मरण करून दिंडी काढणयाची प्रथा आहे. या महिंन्याची जी पुर्णिमा आहे तिला कार्तिकी पुर्णिमा अस म्हणतात .त्या मागच जर काही कारण असेल तर आजच्या दिवशी महादेवचे अंश भूत असे त्यांचे जेस्ट पुत्र कार्तिकेय स्वामी त्यांनी महादेवजी यांच्या कृपेने आजच्या दिवशी त्रिपुराचा वध केला होता. म्हणून तर ह्या पौर्णिमेला त्रिपुरा पुर्णिमा म्हणतात आणि म्हणूनच खान्देशातील रावेर जवळ असलेल एकमेव मंदिर की जे प्रभु रामचंद्र यांच्या चरण कमल रज द्वारा प्रसादी भूत झालेल आहे तिथ कार्तिकेय स्वामींची प्राचीन मूर्ति आहे ते दर्शनीय आहेत तिथ सर्व लोक ह्या पौर्णिमेल दर्शनासाठी अवश्य जातात ह्या पौर्णिमेचा इतिहास असा आहे की भगवान शंकरांनी त्रिपुरा सुराचा वध करून पृथ्वीला दुष्टांच्या तावडीतुन सोडविले त्या निमित्ताने सर्व भारतभर त्रिपुरा पौर्णिमा चा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तारकासुराचा वध होउ नए त्या साठी त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी कठोर तप करून ब्राम्हदेवाला प्रसन्न करून घेतले व त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून ब्राम्हदेवाकडे वर मांगीतला. वर मिळाल्यावर या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकांत अनन्विक अत्याचार केला तेव्हा देवांनी मदतीसाठी भगवान शंकाराची स्तुती केली व महादेवानी ही अशक्य अशी गोष्ट शक्य करून त्रिपुरासुरांचा वध कार्तिकेय स्वामीच्या हातून करवला. हाच तो दिवस . त्रिपुरारी पौर्णिमेला शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून शिवाला प्रिय असणारा बेल व विष्णूला प्रिय असणारी तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा त्रिपुरा पौर्णिमेला पडलेली आहे. त्रिपुरा सुराचा वध केल्याने तिन्ही लोकांत आनंद पसरला त्यामूळे घरोघरी दिव्यांची रोषणाई करण्याचा प्रघात या दिवशी पडला शिवमंदिरा बरोबरच सर्व मंदिरांतूनही व घराघरातून लक्ष्यावधी दीप त्रिपुरा पौर्णिमेला उजळतांना दिसतात. कार्तिक महिन्याच्या या पौर्णिमेला कार्तिकीयाने त्रिपुरा सुरांचा वध केल्याने या दिवशी कार्तिकेयाचीही पूजन केले जाते. केवळ कार्तिक पोर्णिमेच्या रात्री महिला कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. असा संकेत रूढ आहे. कार्तिक पौर्णिमेला जी व्यक्ती गंगास्नान करते तिला दहा यज्ञ केल्याचे पुण्य लाभते असा महिमा आहे. याच दिवशी देवदिवाळीचा उत्सवही संपन्न होतो.भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा त्रिपुरा पौर्णिमेला केली असता व्यक्तीच्या सर्व दुःखाची समाप्ती होते व या बरोबरच धनाधान्याने व्यक्ती परिपूर्ण होतो.अशी मान्यता हिंदू धर्मात आहे. असुरांच्या त्रासातून या दिवशी चिंता मुक्त झाल्याने या दिवशी देवता दिवाळी साजरी करतात. म्हणून त्रिपुरा पौर्णिमेला देवदिवाळी असेही म्हणतात. देवी तुळशीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाल्याची आध्यायीका पुराणातून वर्णलेली आहे. कार्तिक पोर्णिमेला दानाचेही अतिशय महत्व आहे. त्रिपुरा पौर्णिमेला जर दान केले तर त्याचे हजारो पटीत फळ मिळते अशी मान्यता आहे. त्रिपुरा पौर्णिमेला

मासानां कार्तिक: श्रेष्ठो देवानां मधुसूदन।

तीर्थं नारायणाख्यं हि त्रितयं दुर्लभं कलौ॥

आणि

न कार्तिकसमो मासो न कृतेन समं युगम्।

न वेदसदृशं शास्त्रं न तीर्थं गंगा समम्॥

या कार्तिक महिन्या च्या महिम्या च्या ह्या श्लोकांच्या पठानाने सर्व पापांचे शमन होते अशी मान्यता असल्याने कार्तिक पौर्णिमेला या श्लोकांचे भक्तिभावाने पठन केले जाते.

खजिनदार, स्वामीनारायण गुरुकुल, सावदा

- Advertisment -

ताज्या बातम्या