Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये आठ ठिकाणी साकारले व्हर्टिकल गार्डन

औरंगाबादमध्ये आठ ठिकाणी साकारले व्हर्टिकल गार्डन

औरंगाबाद- Aurangabad

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (National Clean Air Program) अंतर्गत शहरात आठ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन (Vertical Garden) उभारले जात आहेत. यातील आणखी दोन ठिकाणचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. टाऊन हॉल परिसर व महावीर चौकातील गार्डनचे काम पूर्ण झाल्याचे उद्यान अधीक्षक  डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगाच्या हवा शुद्धतेसाठी कामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरात आठ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या देखरेखीखाली शहरात विविध ठिकाणी व्हर्टिकल गार्डन (Vertical Garden) उभारण्यात येत आहे.

महापालिका मुख्यालयाजवळ असलेल्या नाल्यावर व्हर्टिकल गार्डनचे (Vertical Garden) काम पूर्ण करण्यात आले. तसेच महावीर चौकातील काम देखील पूर्ण झाले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यापूर्वी सिद्धार्थ उद्यानाशेजारी व्हर्टिकल गार्डनचे (Vertical Garden) काम पूर्ण झालेले आहे. तसेच नागेश्वरवाडी, सरस्वती भुवन महाविद्यालय मार्ग, सिडको बस स्टँड, जुना मोंढा, औरंगपुरा व अन्य ठिकाणी व्हर्टिकल गार्डन (Vertical Garden) तयार केले जात आहेत. या गार्डनमुळे हवा शुद्ध होण्यास मदत होईल तसेच शहराच्या सौंदर्यात वाढ होते. शहरातील नागरिक आणि पर्यटक (citizens and tourists) यांच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वाचे आहे.

विविध चौकात कारंजे

हवेतील धूळीचे कण कमी व्हावेत यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (National Clean Air Program) अंतर्गत आठ ठिकाणी कारंजे बसविले जात आहेत. यातील महावीर चौक व दमडी महल येथील काम पूर्ण होत आले असून, अन्य ठिकाणचे काम प्रगतीपथावर असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या