Saturday, April 27, 2024
Homeनगरप्रवरासंगम येथे नेवासा तालुका व औरंगाबाद जिल्ह्यातील गणेशमूर्तींचे भक्‍तीमय वातावरणात विसर्जन

प्रवरासंगम येथे नेवासा तालुका व औरंगाबाद जिल्ह्यातील गणेशमूर्तींचे भक्‍तीमय वातावरणात विसर्जन

देवगड फाटा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम टोका येथे गोदावरी व प्रवरा नदी संगम या ठिकाणी नेवासा तालुक्यातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

नदीच्या पुलावर जाण्यास मनाई असल्याने अर्धा किलोमीटर मागेच गणेश भक्तांना थांबवून थेट मूर्ती विसर्जनास परवानगी नसल्याने मूर्ती संकलन केंद्रांमध्ये मूर्ती दान करून भाविकांनी शिस्तीचे पालन केले. मूर्ती संकलन केंद्रांमध्ये मूर्ती घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवसभर आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर महाद्वार येथे सर्व गणेश मूर्ती गाडीत ठेऊन महसूल व प्रवरासंगम ग्रामपंचायत च्यावतीने नदी पत्रात गणेश मूर्ती विसर्जन केले गेले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका व जल्लोषाला फाटा देण्यात येवून शांततेने व भक्तीमय वातावरणात हे गणेश विसर्जन झाले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात विघ्नहर्त्यांला निरोप देण्यात आला.

नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे दिवसभर लक्ष ठेऊन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगर येथून वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरपंच संदीप सुडके, ग्रामसेवक शेळके, कामगार तलाठी म्हसे, प्रवरासंगम प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. चोरमले व त्यांचे सहकारी यांनी चोख भूमिका बजावल्या

औरंगाबाद जिल्ह्यातील गणपती विसर्जनची सोय रामेश्वर मंदिर जवळ नदी पात्रा जवळच कृत्रिम तलाव करून त्या ठिकाणी करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या