Friday, April 26, 2024
Homeजळगावसहा तास ओपीडी बंद ठेवून आयएमएचे आंदोलन

सहा तास ओपीडी बंद ठेवून आयएमएचे आंदोलन

जळगाव – Jalgaon :

डॉक्टर आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांवर हल्ला केल्यास जलद गतीने खटला चालवला गेला पाहिजे,करोना काळात रुग्ण सेवा करताना प्राण गमावलेल्या डॉक्टरांच्या कुंटुबियांना आर्थिक मदत द्यावी यासह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आएएमएने (indian medical association) आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.तसेच काळ्या फिती लावूून निषेध करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान,डॉक्टरांनी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णसेवा बंद ठेेवली होती.

सकाळी ९ वाजता आयएए हॉलला अध्यक्ष डॉ. सी .जी .चौधरी .सचिव डॉ राधेश्याम चौधरी ,डॉ उल्हास पाटील ,डॉ अनिल पाटील ,डॉ विलास भोळे ,डॉ राजेश पाटील ,डॉ स्नेहल फेगडे ,.डॉ जितेंद्र कोल्हे ,डॉ दिलीप महाजन ,डॉ.भरत बोरोले,डॉ.तुषार बेंडाळे आदींसह आयएमए चे पदाधिकारी ,सदस्य व डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टरर्सनी मनोगत व्यक्त केले.तसेच राष्ट्रीय आयएमए मुख्यालयाशी लिंकद्वारे थेट संवाद साधून जळगावचे आंदोलन देशभर लाईव्ह दाखवण्यात आले.

राष्ट्रीय सचिव डॉ जयेश लेले यांनी सचिव डॉ .राधेश्याम चौधरी यांच्याशी थेट संपर्क साधून आंदोलकांना मार्गदर्शन केले.त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

अशा आहेत मागण्या

१)आरोग्य सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय आस्थापना (हिंसा प्रतिबंध व मालमत्तेचे नुकसान) विधेयक २०१९, ज्यात, डॉक्टर आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांवर हल्ला केल्यास दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा प्रस्तावित आहे, ते ताबडतोब पारित करावे.

आयपीसी / सीआरपीसी तरतुदींच्या समावेशासह हा कायदा अस्तित्वात यावा. आणि असे खटले ठराविक मुदतीच्या अटींसह जलद गती न्यायालयात चालवले जावेत.

२. कोविड विरुद्ध चे युद्धात प्राण गमावलेल्या डॉक्टरांना त्यांच्या बलिदानाची पावती म्हणून , कोविड हुतात्मा म्हणून ओळखले जायला हवे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने योग्य ती आर्थिक मदत द्यावी.

३. सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करावे. जे लोक लसीकरणाविरूद्ध बोलतात त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्यात यावी.

४. कोविड -१९ नंतर फुफ्फुसातील फायब्रोसिसच्या गुंतागुंत, थ्रोम्बोटिक घटनांमध्ये वाढ आणि बुरशीजन्य संसर्ग वाढत आहेत. त्यासाठी बहुआयामी उपचारांचे मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संशोधन कक्ष स्थापन करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या