Thursday, April 25, 2024
Homeनगरअवैधरित्या दोन तलवारी बाळगणार्‍यास अटक

अवैधरित्या दोन तलवारी बाळगणार्‍यास अटक

नेवासा |तालुका प्रतिनिधी, वार्ताहर| Newasa

अवैधरित्या दोन तलवारी बाळगणार्‍या तरुणाला नेवासा पोलिसांनी तालुक्यातील गेवराई येथे छापा टाकून मुद्देमालासह अटक केली आहे.

- Advertisement -

बुधवार 23 रोजी गुप्त माहितीदारामार्फत बातमी मिळाली की चिंचोली येथील योगेश शिवाजी चावरे याचा तलवार व पिस्टलसह फोटो व्हायरल झालेला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून योगेश शिवाजी चावरे रा. गेवराई, ता. नेवासा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4000 रुपये किमतीची एक नक्षीची पितळी मुठ असलेली लाकडाची म्यान असलेली त्यावर तीन पितळी पट्ट्या असलेल्या म्यानमध्ये 32 इंच लांब पाते असलेली सुमारे दीड इंच रुंदीची पुढे टोकदार लोखंडी तलवार तसेच 4000रु. किमतीची दुसरी एक नक्षीकाम असलेली पितळी मुठीची लाकडाची म्यान असलेली 17 इंच लांब पितळी साखळी असलेली व म्यानमध्ये 32 इंच लांब पाते असलेली लोखंडी तलवार अशा एकूण 8 हजार रुपये किंमतीच्या दोन तलवारी जप्त केल्या.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे, उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक महेश कचे, पोलीस नाईक सुहास गायकवाड, बबन तमनर, पोलीस नाईक कुंढारे, कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, कॉन्स्टेबल गणेश इथापे, होमगार्ड मोहन गायकवाड, श्री. शेख यांनी ही कारवाई केली. सदर गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व कॉन्स्टेबल भागवत शिंदे करत आहेत.

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत गुंड प्रवृत्तीचे लोकांकडे कोणत्याही प्रकारे अवैध हत्यार असल्यास त्यांची माहिती आम्हाला समक्ष द्यावी अथवा पोलीस ठाणे येथे संपर्क करावा.

– रणजित डेरे पोलीस निरीक्षक नेवासा

- Advertisment -

ताज्या बातम्या