Friday, April 26, 2024
Homeनगरअवैध गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापे

अवैध गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने श्रीरामपूर शहरातील तीन ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 3 जणांविरुध्द कारवाई करुन सुमारे 52,000 रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची दारु बनविण्याचे साधने, 900 लि. कच्चे रसायन व 70 लि. तयार दारु नष्ट केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सध्या अवैध गावठी हातभट्टीचे दारुच्या ठिकाणी पोलिसांचे जिल्हाभर छापासत्र सुरु आहे. त्यानुसार काल जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे, विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथकाने शहरातील गोंधवणी वडारवाडी येथील तीन दारुअड्ड्यावर अचानक छापे टाकले.

या कारवाईत सर्वप्रथम गोरख लक्ष्मण गायकवाड याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे 400 लि. कच्चे रसायन, 2 हजार रुपये किमतीचे 20 लि. तयार दारु नष्ट केली. दुसर्‍या ठिकाणी सुधीर सुरेश फुलारी याचे दारु अड्ड्यावर छापा टाकला असता त्याचेकडून 10 हजार रुपये किमतीचे 200 लि. कच्चे रसायन, 2 हजार 50 रुपये किंमतीची 25 लि. तयार दारु नष्ट करण्यात आली. तिसर्‍या ठिकाणी एक महिला अवैध दारु विक्री करत होती. पोलिसांनी तिच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे 300 लि. कच्चे रसायन 2 हजार 500 रुपये किंमतीचे 25 लि. तयार दारु नष्ट केली. या तिघांविरुध्द पोलिसांनी भादंवि क्रमाक मु.प्रो.अ.क. 65 (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या