Wednesday, April 24, 2024
Homeजळगावगुजरातच्या पावत्यांवर जळगावात वाळूची अवैध वाहतुक

गुजरातच्या पावत्यांवर जळगावात वाळूची अवैध वाहतुक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गुजरातमधील (Gujarat) वाळूच्या ठेक्यांवरील (sand contracts) पावत्यांवर (receipts) जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) वाळूची अवैध वाहतुक (Illegal transportation of sand) करणार्‍या डंपर शनिवारी रात्री शहर पोलिसांनी(police) पकडले. थेट गुजरामधील वाळूच्या पावत्यांचा सर्रासपणे जिल्ह्यात वापर केला जात आहे. परंतु वाळू उपसा करणार्‍यांवर महसूल प्रशासनाकडूनन कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नसल्याने महसूल विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांचे वाळू व्यावसायीकांसोबत असलेले हितसंबंधत यातून पुन्हा उघड होत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या वर्षी एकही वाळूच्या गटाचा लिलाव झालेला नसून नदीपात्रातून वाळू उपसाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र वाळू व्यावसायीकांकडून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. दिवसभरात शेकडो डंपरांसह ट्रॅक्टरमधून वाळूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतुक केली जात आहे. परंतु महसूल विभागाकडून अवैध वाळूची वाहतुक करणार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने त्यांना महसूल विभागातील अधिकार्‍यांचे अभय मिळत असल्याचे उघड होत आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास काँग्रेस भवनाजवळ शहर पोलिसांनी अवैध वाळूचे डंपर पकडून ते शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी डंपरचालकाकडून पोलिसांना गुजरात राज्यातील भरुच जिल्ह्यातील जगडिया गावातून भरलेल्या वाळूची पावती दाखविण्यात आल्याने गुजरामधील पावत्यांचा जळगावात वापरत होत असल्याचा गंभीर प्रकार वाळू व्यावसायीकांकडून केला जात आहे.

पावत्यांबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

गुजरामधील पावत्यांचा जळगाव जिल्ह्यात वापर केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी लेखी तक्रार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे केली आहे. परंतु तरी देखील पोलीस प्रशासनाकडून डंपरचालकावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नव्हती.

जिल्हाधिकार्‍यांसह महसूल विभागाचा कानाडोळा

गिरणा नदीपात्रातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात आहे. परंतु अवैध वाहतुक करणार्‍यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांसह महसूल विभागाकडून कुठल्याच प्रकारे कारवाईची मोहीम राबविली जात नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांसह महसूल विभागाचा अवैध वाळू व्यावायीकांकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या