तापीतून वाळूचा उपसा करून अवैध वाहतूक

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदी पात्रातून वाळूचा बेसुमार उपसा करून अवैध वाहतूक करणार्‍या वाळू माफियांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारून सोमवारी थाळनेर येथील तापी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करून वाहन जप्त केले.

थाळनेर तापी नदी पात्रातून व नदी-नाल्यातून वाळूचा विनापरवाना बेसुमार उपसा करून अवैध वाहतूक होत असल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंग बांदल व तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तलाठी व कर्मचार्‍यांचे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

सदर पथकांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा केले आहे. सदर कारवाई नायब तहसीलदार गणेश अढारी, मंडळ अधिकारी व्ही. के. बागुल, पी. पी. ढोले, तलाठी सुनील मराठे, वाहन चालक सतिश पाटोळे, शिपाई, कोतवाल थाळनेर यांच्या पथकाने केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *