Wednesday, April 24, 2024
Homeधुळेनटराज सॉ मिल मध्ये अवैध लाकुड साठा : वनविभागाची कारवाई

नटराज सॉ मिल मध्ये अवैध लाकुड साठा : वनविभागाची कारवाई

सोनगीर Songir (वार्ताहर)

येथील नटराज सॉ मिल (Nataraja Saw Mill) मध्ये अवैध लाकुड साठा (Illegal timber stocks) प्रकरणी वनविभागाचे (Forest Department) अधिकारी व कर्मचारी मंगळवारी व गुरुवारी दोन दिवस सलग ठान मांडुन आहेत. लाकुडसाठाची (Measurements) मोजमाप करण्यात आले असून ४३४ नग मिळून आल्याने तब्बल २०६ घनमिटर इमारतींचे व ६० घनमिटर जळावू लाकुड साठा आढळून आले. गुरुवारी दिवसभर लाकुड मोजमापचे काम सुरू होते.

- Advertisement -

सोनगीर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड (Deforestation) करून अवैध लाकुड साठा प्रकरणी नटराज सॉ मिल वर दुसऱ्यांदा कारवाई ला सामोरे जावे लागत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. नटराज सॉ मिल (Nataraja Saw Mill) मध्ये वनविभागाने कारवाई होऊन ही अवैध लाकुड साठा करून कटाईचे काम सुरूच आहे व ठोस कारवाई (Action) होत नसल्याने संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पवार (Anil Pawar) यांनी दि.३१ मार्च रोजी वनसंरक्षक दिगंबर पगार (Forest Ranger Digambar Salary) यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

तक्रारीची दखल घेत दि.५ एप्रिल रोजी फिरते पथकाने नटराज सॉ मिल येवून तपासणी केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी १० जागेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यत लाकुड मोजमाप (Measurements) करण्याचे काम सुरू होते.यात ४३४ नग (लाकुडच्या मोपा) आढळून आले.याची मोजणी केली असता २०६ घनमिटर इमारतींचे व ६० घनमिटर जळावू लाकुड,६७ घनमिटर कटसाईज लाकुड साठा (Cut size wood) मिळून आला. सदर लाकुड चा पंचनामा करून सविस्तर अहवाल वरीष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती तक्रारदार अनिल पवार यांनी दिली.

यावेळी नटराज सॉ मिल (Nataraja Saw Mill) चे मालक व तक्रारदार यांचे जबाब घेण्यात आले.यावेळी फिरते पथकाचे वनपाल किशोर वराडे ,गस्ती पथक पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील ,सोनगीर चे वनपाल दत्तात्रय मोरे, स्मिता पाटील ,वनरक्षक एन वि साठे , सोनगीर वनविभागाचे वनरक्षक भरत बोरसे, वनमजूर रतिलाल कोळी, तक्रारदार अनिल पवार, यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

कारवाईचे पूर्ण होईपर्यंत लाकुड कटाईचे काम बंद ठेवावे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दोन दिवस नटराज सॉ मिल मध्ये चौकशी सुरू होती.मोठ्याप्रमाणावर अवैध लाकुड साठा मिळून आला असून वनविभागाची कारवाई होई पर्यंत नटराज सॉ मिल मध्ये लाकुड साठा करून कटाई चे काम बंद ठेवावे. हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय आहे तरीही नटराज सॉ मिल मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकुड साठा कसा काय याकडे दुर्लक्ष कसे केले याबाबत शंका आहे.

अनिल पवार तक्रारदार तथा वृक्षप्रेमी

- Advertisment -

ताज्या बातम्या