Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरात अवैध कत्तलखान्यावर छापा सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपुरात अवैध कत्तलखान्यावर छापा सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील शहरातील वॉर्ड नंबर 2 बाबरपुरा येथे छापा टाकून पोलिसांनी गोवंशीय जनावरांचे 200 किलो मांस व मांस वाहतूक करणारा टेम्पो असा सव्वा सहा लाख रुपरे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्येे गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल होत असल्याची अशी खात्रीशीर व गोपनीय माहिती पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांना मिळाल्याने श्रीरामपूर शहरातील शहरातील वॉर्ड नं. 2 मधील बाबरपुरा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक व दोन पंचासह छापा टाकला. यावेळी समीर मुराद कुरेशी (वय 27, वार्ड नं. 2, बीफ मार्केट जवळ, श्रीरामपूर) व मोहसीन इस्माईल कुरेशी उर्फ बुंदी (रा. बाबरपुरा वार्ड नं. 2) याचे ताब्यातून 6 लाख रुपये किंमतीचा बोलेरो पिकप मालवाहू गाडी तदेच 26 हजार रुपये किंमतीचेे 200 किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त करण्यात आले.

सदरच्या छाप्याचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून उपविभागीय कार्यालयातील पो. कॉ. नितीन शिरसाठ यांनी शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून समीर मुराद कुरेशी (वय 27, वार्ड नं. 2, बीफ मार्केट जवळ, श्रीरामपूर) व मोहसीन इस्माईल कुरेशी उर्फ बुंदी (रा. बाबरपुरा, वार्ड नं 2) यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं – ख श्र 397/2022, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कलम 5, 5 (क) 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके, एएसआय आरोळे, हे. कॉ. सुरेश औटी, पो. ना. भैरवनथ आढागळे, पो. कॉ. नितीन शिरसाठ आदींनी सदरची कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या