Friday, April 26, 2024
Homeनगरअवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील वासुंदे गावानजीक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोकलेनसह तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

वासुंदे येथील बरवे नगर येथे शासकीय काम करणार्‍या ठेकेदाराने वाळू साठा करून ठेवला होता. त्याचा पंचनामा महसूल विभागाने सुरू केला आहे. तर दुसरीकडे वासुंदा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई करण्यात आली असून पारनेर तालुक्यातील गौण खनिज वाहतूक करणार्‍या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे.

शनिवारी केलेल्या कारवाईमध्ये वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार देवरे सांगितले आहे. देवरे आपल्या पथकाला घेऊन मुळा नदीपात्रात वाळू कारवाईसाठी निघाले असताना शनिवारी सकाळी वासुंदे येथील बर्वे नजीक फाट्याजवळ असताना अनेक वर्षे काम पूर्ण होऊनही त्या कामाजवळ वाळू साठा पडला होता तो महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे.

दरम्यान मुरूम वाहतूक करणारा एक डंपर ताब्यात घेतला असून त्यामध्ये जवळपास चार ब्रास मुरूम आढळून आला आहे. वाळू असो वा मुरूम किंवा माती खडी जे गौण खनिज आहे, त्याचा महसूल भरूनच यापुढील काळात वाहतूक करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या