Friday, May 10, 2024
Homeजळगावअवैध वाळूसाठा व वापर : तहसीलदारांची न.पा. ठेकेदाराला चार लाखांच्या दंडाची नोटीस

अवैध वाळूसाठा व वापर : तहसीलदारांची न.पा. ठेकेदाराला चार लाखांच्या दंडाची नोटीस

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

जिल्ह्यात वाळू उचल बंदी (Ban on sand lifting) असतांना येथील नगरपालिका ठेकेदाराने (Municipal contractor) अवैध वाळूसाठा (Illegal sand storage) केला व त्याचा वापरही केला म्हणून तहसीलदार (Tehsildar) भुसावळ यांनी या ठेकेदाराला सुमारे चार लाख रूपये दंड आकारणी संदर्भात नोटीस (Notice regarding penalty) बजावली असल्याने ठेकेदारामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

14व्या वित्त आयोगातून नगरपरिषदेत गडकरी नगर मधील डि. एल. हिंदी शाळे जवळील नाल्यावर सुमारे 51 लाख रूपये खर्चाची सुरक्षा भिंत उभारणीचे काम दिप्तेश अशोक सोनवणे यांना दिले आहे. हे बांधकाम सुरू असतांना तलाठी सातारे यांनी कामाच्या जागेची पाहणी केली असता तेथे शासनाची कुठलीही परवानगी अथवा रॉयल्टी न भरलेला 15 ब्रास वाळूसाठा आढळून आला.

यावरून तहसीलदर भुसावळ यांनी जिल्हाधिकार्‍यांचे आदेशाचे उल्लंघन व महाराष्ट्र अधिनियम 1966 (7) अन्ये तीन दिवसात लेखी खुलासा करावा व योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत वाळूचा वापर करू नये असे आदेश केले असून जागेवर अवैध वाळू आढळून आल्याने ठेकेदाराला 3 लाख 98 हजार 620 रूपये इतका दंड आकारला जाईल, अशी नोटीस बाजावली आहे.

संबंधित ठेकेदाराने खुलासा सादर केला अथवा काय या माहितीसाठी तहसीलदारांशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. प्रत्यक्ष कामाठिकाणी भेट दिली असता काम बंद दिसून आले.

सहा महिने जुने शपथपत्र तरी निविदा मंजूर

नगरपरिषदेच्या 14व्या वित्त आयोगातून 51 लाख रूपये खर्चाचे हे काम होत आहे. यात दिप्तेश सोनवणे यांच्यासह जिवन सरोदे व चर्तुभूज कन्स्ट्रक्शन या तिघांनी निविदा भरल्या होत्या त्यात प्री-बीड वेळी दिले जाणारे शपथपत्र सहा महिने जुने असून एकमेकांना हीच मंडळी साक्षीदार देखील आहेत. जुने कागदपत्रांचा वापर करून या निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याने संबंधित कामाची निविदा ही जिल्हास्तरावरून पुन्हा तपासणीची मागणी केली गेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या