Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाळू उपसा करणार्‍या आठ बोटी फोडल्या

वाळू उपसा करणार्‍या आठ बोटी फोडल्या

शिरूर (तालुका प्रतिनिधी) –

कुर्‍हाडवाडी व निमोणे (ता. शिरूर) हद्दीत नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतुकीवर शिरूर पोलिसांच्या पथकाने

- Advertisement -

धडक कारवाई करून अनाधिकृत वाळू उपसा करणार्‍या 8 बोटी फोडल्या. शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून वाळू माफीयांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक खानापूरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू माफीयांवर कडक कारवाई करण्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आदेश दिल्यानुसार पथके तयार करून मोठी मोहीम आखण्यात आली त्यानुसार नदी पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने कुर्‍हाडवाडी, निमोणे येथील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍या चार मोठ्या व चार लहान यांत्रिक बोटी शनिवारी (दि. 20) फोडून उध्वस्त करण्यात आले.

त्यांचे वाहनांचा परवाना रद्द करण्याकरीता तालुका दंडाधिकारी तसेच प्रादेशीक परीवहन अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोटे, पो. हवालदार संतोष साठे, पो. ना. अनिल आगलावे, पो.ना. उमेश भगत, पो. काँ. प्रशांत कुटेमाटे, पो. कॉ. प्रवीण पिठले, पो. कॉ करणसिंग जारखाल, पो. ना. संजय जाधव, पो. काँ. तारचंद जाधव, पो. ना. शंकर चव्हाण यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या