Thursday, April 25, 2024
Homeनगरदारू विक्री करणार्‍यांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

दारू विक्री करणार्‍यांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले पोलिसांनी (Akole Police) अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol) करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाईचा (Action) बडगा उगारला आहे. अवैध दारू विक्रीसाठी नेेत असताना पोलिसांनी (Police) मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे (Raid) टाकले. या कारवाईमध्ये 1 लाख 54 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर पाच आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

- Advertisement -

अकोले पोलिसांना (Akole Police) मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा सत्र सुरू केले. यात सुगाव ते लिंगदेव जाणारे रोडवर वाशेरे फाटा येथे मंगेश कोंडाजी ढोकरे (वय 36, शाहूनगर, ता. अकोले) व दत्तात्रय दिनकर नाईकवाडी (रा. अकोले) हे 2 ऑगस्ट रोजी रात्री 2 वा. दरम्यान 80 बॉबी संत्रा देशी दारूच्या सीलबंद बाटल्या स्प्लेंडर मोटरसायकलवर अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक करत असताना मिळून आले. या दोन्हीही आरोपींना ताब्यात घेऊन अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Akole Police Station) करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या गुन्ह्यात 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. दरम्यान तालुक्यातील अकोले ते वाघापूर अवैध दारुची वाहतूक (Transport of illegal liquor from Akole to Wagahpur)होणार असल्याचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे (API Mithun Ghuge) यांना माहिती समजली. त्यांनी त्वरित पोलिसांचे पथक पाठवून छापा टाकून अवैधरित्या दारूविक्री करण्याचे उद्देशाने दारू वाहतूक करताना सद्दाम सलीम मणियार (कमानवेस, अकोले) रंगनाथ शांताराम पवार, सुनील बबन लांडे ( दोघे रा. वाघापूर) यांना 1 लाख 20 हजार 160 रुपयांची अवैध दारू वाहतूक करताना एका चार चाकी वाहनासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

या दोन्हीही घटनेतील पाचही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अकोले याचेसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई अकोले पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश आहेर, किशोर तळपे, विठ्ठल शरमाळे, पो.कॉ. कुलदीप पर्बत, विजय आगलावे, आत्माराम पवार यांच्या पथकाने केली आहे.

तालुक्यातील कोणत्याही गावात,वाडीवर, वस्तीवर, अवैध दारू विक्री केली जात असेल तर त्याची माहिती अकोले पोलिसांना द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव व गाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या