Friday, April 26, 2024
Homeनगरअवैध देशी, गावठी हातभट्टी अड्ड्यांवर छापे

अवैध देशी, गावठी हातभट्टी अड्ड्यांवर छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी दारू व गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी पाच ठिकाणी छापेमारी करत दारू विक्री करणार्‍यांकडून मुद्देमाल जप्त करत त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

शेंडी शिवारात देठे वस्तीवर रोडलगत अवैध देशी दारू विक्री करणार्‍या संतोष पांडुरंग त्रिंबके (वय 45 रा. शेंडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. निंबळक शिवारात राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍या शंकर लालू यादव (वय 39) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निंबळक बायपास रोडवरील शिंदे वस्तीवर गावठी हातभट्टी विक्री करणार्‍या सुमन अशोक खंडागळे (वय 52) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिच्याकडून एक हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.मनमाड रोडवरील हॉटेलच्या आडोशाला देशी दारूची विक्री करणार्‍या सचिन ज्ञानदेव शिंदे (रा. जोगेश्वरी ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून पाचशे रुपयांची दारू जप्त केली आहे. महेश सुरेश वाल्हेकर (वय 23 रा. पोखर्डी) हा नगर-औरंगाबाद जाणार्‍या रोडलगत गावठी हातभट्टी विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या