Friday, April 26, 2024
Homeनगरसायखिंडी फाट्याजवळ जमीन मालकाकडून बेकायदेशीर मुरुम उपसा

सायखिंडी फाट्याजवळ जमीन मालकाकडून बेकायदेशीर मुरुम उपसा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

नाशिक-पुणे महामार्गावरील सायखिंडी फाटालगत एका जमिनीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उपसा केला जात आहे. या जमीन मालकाने जमीन सपाट करण्याच्या नावाखाली खुलेआम मुरूम विक्री सुरू केली आहे. महसुल प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

- Advertisement -

तालुक्यातील सायखिंडी फाट्या लगत असणार्‍या या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुरूम आहे. या जमीन मालकाने जमीन लेवल करण्यासाठी महसूल खात्याकडून परवानगी घेतली. जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली या व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर मुरूम विक्री सुरू केली आहे. या जमिनीतून उत्खनन केलेला मुरूम वेगवेगळ्या वाहनांमधून परिसरातील गावांमध्ये पाठवला जात आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या मुरूम उपसा बाबत काही जागृत नागरिकांनी महसूल अधिकार्‍यांना माहिती दिली.

या ठिकाणावर महसूल खात्याचे पथक पाठवून माहिती घेतली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे एका अधिकार्‍याने सांगितले. संगमनेर तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उपसा केला जात आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधितांचे चांगलेच फावले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तालुक्यातील मुरूम उपसा बाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या