Friday, April 26, 2024
Homeनाशिकअवैध मद्यसाठा जप्त

अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक | दि. १३ प्रतिनिधी

हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात चारचाकी वाहनावर छापा टाकला नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्रमांक एक च्या भरारी पथकाने राज्यात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मीत बारा लाखाचे बेकायदा मद्य जप्त करण्याची कारवाई केली आहे. तर या प्रकरणी गुजरात राज्यातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

मिनेशभाई कांतीलाल पटेल (३० रा.कुरगावमदन ता.धरमपुर) व जयेशभाई अरविंदभाई हडपती (३४ रा.सलवानगाव ता.वापी जि.बलसाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळापासून बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. निरीक्षक मधुकर राख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुत्रावे यांना मिळालेल्या माहिती नुसार पथकाने हरसूल पेठ मार्गावर सापळा लावला असता ही कारवाई करण्यात आली.

भरधाव येणार्‍या (जीजे ०१ केएम ९३८७) या वाहनाचा भरारी पथक क्र.१ ने पाठलाग करीत दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये मध्ये बनवलेल्या चोर कप्यात राज्यात बंदी असलेला आणि दादर नगर हवेली निर्मीत रॉयल स्टॅग,इम्प्रीयल ब्ल्यू,जॉन मार्टीन व्हिस्कीसह कासबर्ग, ट्युबर्ग,किंगफिशर बिअर आदींची खोकी मिळून आली.

पथकाने दोघांना अटक करून वाहनासह १२ लाख १३ हजार ४० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई दुय्यम निरीक्षक राम सुपेकर जवान विलास कुवर,सुनिल पाटील,धनराज पवार अनिता भांड आदींच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सुत्रावे करीत आहेत.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या