Friday, April 26, 2024
Homeनाशिक६६ लाखांचा गुटखा जप्त

६६ लाखांचा गुटखा जप्त

दिंडोरी । संदिप गुंजाळ Dindori

आज स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गुप्त माहिती नुसार ओझरखेड परिसरात सापळा रचून अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला आहे

- Advertisement -

मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे एक चॉकलेटी रंगाचे वाहन के.एम.एच १२ एस.एफ.४५७५ ही गाडी नाशिक बाजुकडे येतांना दिसली. सदर वाहन अडवुन वाहनावरील चालक मंगेश गोरखनाथ व-हाडी, वय ४८, रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे यास विचारपुस केली असता, सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली,

नंतर सदर वाहन हे वणी पोलीस स्टेशनला घेवुन जावुन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये आतमध्ये सफेद रंगाच्या गोण्यांमध्ये आर.एम.डी. गुटख्याचे १२० मोठे बॉक्स, तसेच एम. टोबॅको मिक्स तंबाखुचे ६० मोठे बॉक्स किं.रू.४८ लाख ९६ हजार चा अवैध गुटखा, ०७ लाख ३२ हजार ७९० रूपये परव्युटन माल, १० लाख रुपये किंमतीचे मालट्रक वाहन असा एकुण ६६ लाख २८ हजार ७९० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर वाहनावरील चालकास विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर माल हा गुजरात राज्यातील पिंपळद, अहमदाबाद येथील ट्रान्सपोर्ट येथुन भरलेला असुन पुणे येथे टान्सपोर्टचेच ऑफिस मध्ये घेवुन जात असल्याचे सांगितले आहे. सदर बाबत वाहन चालकाविरूध्द वणी पोलीस ठाणेस भादवि कलम ३२८,२७२,२७३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा सन २००६ चे कलम २६(२)(iv), २७(३)(d)(e), ३०(२)(a), ३(१)(72) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर माल हा कोणी पाठविलेला आहे तसेच कोणाला व कोठे पाठविण्यात येत होता याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे प्रभारी पोलीस अधीक्षक संदिप घुगे.(अपर पोलीस अधीक्षक मालेगाव) व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . के.के.पाटील, सहा.पोलीस निरीक्षक .अनिल वाघ, सपोउनि रामभाऊ मुंढे, पोहवा दिपक आहिरे, वसंत साबळे, गणेश वराडे, प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, जे.के. सुर्यवंशी, संजय गोसावी, पोना प्रविण सानप, वसंत खांडवी, अमोल घुगे, पोकॉ संदिप लगड, चालक पोना काकडे, म्हसदे यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या