Wednesday, April 24, 2024
Homeनगरनवलेवाडी परिसरात अवैध धान्यसाठा आढळला

नवलेवाडी परिसरात अवैध धान्यसाठा आढळला

अकोले |प्रतिनिधी| Akole

शहराजवळील नवलेवाडी परिसरात एका घरात अवैद्य धान्यसाठा आढळल्या मुळे तालुक्यात सुरू असणारा रेशन धान्याचा काळाबाजार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. रेशन धान्याच्या अफरतफरीची अलीकडच्या काळातील ही तिसरी घटना. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली आहे.

- Advertisement -

अकोले शहराललगतच्या नवलेवाडी परिसरात रात्रीच्या वेळेला एके ठिकाणी रेशनच्या धान्य पोत्यातील धान्य अन्य पोत्यात भरता असल्याचे भाजप कार्यकर्ते यांच्या लक्षात आले. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, राज गवांदे,शंभू नेहे, संदीप दातखिळे, अजय खरात आदी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी प्रशासनाला ही याबाबत माहिती दिली.

तहसीलदार सतीश थेटे, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे,मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी प्रवीण ढोले व अन्य संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनेची समक्ष पाहणी केली.व धान्य गोण्या, आयशर टेंपो ताब्यात घेतला.

आज सकाळी या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी रेशन तांदळाच्या भरलेल्या 75 गोण्या,खाकी बारदानाच्या रिकाम्या 158 गोण्या, सरकारी धान्य वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 26 सफेद गोण्या, नर्मदा पोल्ट्री फीड कंपनीचे नाव असलेल्या रिकाम्या 200 गोण्या, तसेच घराचे पूर्व बाजुला उभ्या असणाऱ्या सफेद रंगाच्या आयशर कंपनीचा एम एच 17,बी वाय-3518 या टेम्पोमध्ये नर्मदा पोल्ट्री फीड कंपनीचे नाव असलेल्या 107 गोण्या आढळून आल्या. शासकीय रेशन धान्य दुकानासाठी वरल्या जाणाऱ्या खाकी 300 रिकाम्या गोण्या मिळून आल्या.

प्रमोद नवले यांचे हे घर आहे. त्यांनी ते राजूर येथील दत्ता चोथवे यांना भाड्याने दिलेले आहे. चोथवे यांचा धान्याचा व्यापार असल्याचे त्यांनी नवले यांना सांगितले होते. यासंदर्भात माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तहसीलदार थेटे व सहा. पो नि घुगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. व सबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.व जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे आश्वासन तहसीलदार सतीश थेटे यांनी माजी आ पिचड यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाला दिले.

यावेळी कोतुळचे माजी सरपंच राजेंद्र देशमुख, राज गवांदे, बाळासाहेब वडजे, परशराम शेळके, सचिन शेटे, राहुल देशमुख, शंभू नेहे, अरुण शेळके, विजय पवार, नरेंद्र नवले, कैलास जाधव, किशोर काळे, प्रसन्न धोंगडे, शंकर घोलप, सौरभ देशमुख, संदीप दातखिळे, गोकुळ वाघ, रोहिदास जाधव, नितीन गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत रात्री उशिरा पर्यंत अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

भाजप कार्यकर्त्यांनी रेशन धान्य काळा बाजारचा हा गुन्हा उघडीकस आणला आहे. मात्र काही जणांकडून या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात आहे. हे सहन केले जाणार नाही. असा इशारा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या