Saturday, April 27, 2024
Homeनगरअवैध गावठी दारू वाहतूक करताना राजूर पोलिसांनी तिघांना पकडले

अवैध गावठी दारू वाहतूक करताना राजूर पोलिसांनी तिघांना पकडले

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील दारूबंदी असलेल्या राजूर गावात विक्रीसाठी आणली जाणारी अवैध गावठी दारू राजूर पोलिसांनी पकडली.

- Advertisement -

याप्रकरणी दारू वाहतूक करणार्‍या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की, याबाबत माहिती मिळाल्याने तातडीने पथक पाठवले असता राजूर ते चितळवेढे रोडवर टाटा व्हीस्टा एमएच 48 ए-2449 या क्रमांकाच्या गाडीमध्ये निलेश अशोक घाटकर व विक्रम अशोक घाटकर हे दोघे गावठी दारूची वाहतूक करीत असताना आढळून आले.

या गाडीमध्ये 31 हजारांची गावठी दारू मिळून आली मात्र यातील एकजण फरार झाला. तर याच रस्त्यावर एम एच 1 यू- 3570 या दुचाकीवर सागर भारमल याच्याकडे 60 लीटर गावठी दारू मिळून आली.

यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 248-249/2020 मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार करत आहेत.

राजूर गावात 2005 साली संपूर्णत: दारू बंदी झालेली आहे. यानंतर मात्र राजूर गावात अवैध दारू धंदे जोरदार सुरू झाले. कारवाया करून देखील अवैध दारू विक्री थांबण्याचे नाव घेत नव्हते. दिवसेंदिवस यात वाढच होत गेली. मात्र सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राजूर पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अवैध व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाया केल्या तर काहींना तडीपार केले. यामुळे अवैध धंदे करणांराचे खर्‍या अर्थाने ते कर्दनकाळ ठरले आहेत. अपवाद वगळता आजमितीला राजूरमध्ये अवैध दारू धंदे थांबण्यात त्यांना यश आले आहे. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे सर्व स्तरावरवरून कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या