Sunday, April 28, 2024
Homeनंदुरबारकोंडाईबारी घाटात 10 लाखाच्या अवैध सुगंधीत तंबाखूसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त

कोंडाईबारी घाटात 10 लाखाच्या अवैध सुगंधीत तंबाखूसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) व अन्न औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (National Highway No.6) वरील कोंडाईबारी घाटात (Kondaibari ghat) सुगंधीत तंबाखूच्या (Illegal flavored tobacco) वाहतुकीवर धडक कारवाई (action) करत 9 लाख 72 हजार रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखूसह 40 लाखाचे कंटेनर जप्त (seized) करून एकास अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना माहिती कळवून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते . मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या मदतीने दि. 18 जुलै रोजी कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सापळा रचला .

विसरवाडी येथुन कोंडाईबारी घाटाच्या दिशेने येणार्‍या वाहनांची तपासणी करीत असतांना एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसुन आल्याने पोलीस पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा दिला . परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाहन पुढे नेले .

पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी शिताफीने वाहनाचा पाठलाग करुन ते वाहन थांबवुन ताब्यात घेतले. वाहनावरील वाहन चालका किशोर गुलाब बुवाडे रा . हिवरा वासुदेव ता . मुखेड जि . छिंदवाडा , मध्य प्रदेश यास कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यामुळे पोलीसांनी दोन पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या .

सदर गोण्या उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मिळुन आली . आरोपीतास सदरची सुगंधीत तंबाखू बाबत विचारपुस केली असता त्याने गुजरात राज्यातील वापी येथुन विकत घेवून नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले .

ताब्यात घेण्यात आलेला अशोक लेलॅण्ड कंपनीचा कंटेनर ( क्र.एम.एच.- 40 सी.डी. 7896) यात 9 लाख 72 हजार रुपये किमतीच्या 30 कि.ग्रॅ . वजनाच्या सुगंधीत तंबाखूच्या एकुण 108 गोण्या, 40 लाखाचे अशोक लेलॅण्ड कंपनीचा कंटेनर असा एकूण 49 लाख 72 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन संशयीत आरोपी नामे किशोर गुलाब बुवाडे याच्याविरुध्द् विसरवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 188,172,273,328 , सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

सदरची सुगंधीत तंबाखू ही कोणाकडून विकत आणली तसेच कोणास विकण्यास जात आहे याबाबत पोलीस तपास करीत असून दोषींविरुद् कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील , अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार , विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश चित्ते , पोलीस नाईक अनिल राठोड , पोलीस कॉन्सटेबल लिलेश पाडवी , अतुल पानपाटील , नितीन ठाकरे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या