Friday, April 26, 2024
Homeनगरपिंपळेत खाण दगडांचे अनधिकृत उत्खनन

पिंपळेत खाण दगडांचे अनधिकृत उत्खनन

संगमनेर (प्रतिनिधी) –

पर्यावरणाला धोका पोहोचवत अत्यंत बेकायदेशीरपणे 2009 पासून पिंपळे येथील दगडाच्या खाणीतून बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याप्रकरणी

- Advertisement -

भाजपचे पदाधिकारी सुभाष रावबा गिते यांना संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी एक कोटी 8 लाख 13 हजार 880 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पिंपळे येथील सर्वे नंबर 318, 230, 229, 228 येथे खाण असून या सदरील खाणीतील दगड हा स्टोन क्रेशर करीता उपयोग करण्यात येत असतो. सुभाष रावबा गिते यांनी सदर जमिनीतून 2009 पासून बेकायदेशीरपणे दगडाचे उत्खनन करून पर्यावरणाचे व शासनाचे नुकसान केले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गंभीरे यांनी तहसीलदार, संगमनेर यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या. स्टोन क्रेशर बंद करून आज पावेतो केलेल्या उत्खननाची नुकसान भरपाई व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काही अधिकार्‍यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती असेही गंभीरे यांनी म्हटले होते.

अत्यंत बेकायदेशीरपणे दगडाचे उत्खनन होत असून यामुळे पर्यावरणाचे नुकसान होतेच आहे. परंतु विनापरवाना लाईट वापरून वीज मंडळाची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तातडीने हे क्रेशर बंद करावे अन्यथा आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही भाऊसाहेब गंभीरे यांनी दिला.

दरम्यान, संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली. सदर खाणीतील ईटीएस मोजणीनुसार रॉयल्टी रक्कम 1 कोटी 8 लाख 13 हजार 880 शिल्लक असून सदर रक्कम शासन जमा करण्याबाबत खाण मालकास कळविले. मात्र खाणमालक यांनी हलगर्जीपणा तसेच दांडगाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामळे तहसिलदारांनी दि. 16 मार्च 2021 रोजी सुभाष रावबा गिते यांना एक कोटी आठ लाख 13 हजार 880 इतका दंड निश्चित केला असून महसूल अधिकार्‍यांना पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन संबंधीतांचे स्टोन क्रेशन तात्काळ पुढील आदेश होईपर्यंत सील करण्यात यावे, तसेच सिल केल्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या